आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंड संघाचा भारताविरूद्धच्या एकदविसीय मालिकेत 2-3 ने पराभव झाला असला तरी त्यांनी आपल्या खेळाने तमाम भारतीयांचे मन जिंकले आहेत. मर्यादित षटकांच्या खेळात धोनी ब्रिगेडने आपली योग्यता जरी सिद्ध करून दाखवली असली तरी कसोटीमधील त्यांच्या पराभवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
घरच्या मैदानावर नेहमी प्रभुत्व गाजवणा-या टीम इंडियाला कसोटीमध्ये इंग्लिश कर्णधार एलिस्टर कुकने पराभवाचे पाणी पाजले. इंग्लंडच्या या विजयामध्ये कुकचे मोठे योगदान राहिले. त्याने आपल्या बॅटने टीम इंडियाच्या गोलंदाजांना पळता भुई थोडे केले होते. फलंदाजीबरोबरच त्याने आपल्या हुकमी नेतृत्व शैलीचे दर्शनही सर्वांना करून दिले. त्याने आपल्या या दुहेरी कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले.
ग्लुसेस्टरमध्ये जन्मलेला एलिस्टर कुक तसा पाहिला तर एक गंभीर आणि लाजाळू क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र कधी-कधी तो इतका बोल्ड बनतो की तो हाच एलिस्टर कुकच आहे का असे प्रश्न आपल्याला पडतो. 2008 मध्ये त्याने एका कार्यक्रमात न्यूड मुलींचे बॉडी पेटिंग केले होते. तसेच त्याने स्वत: ही एका स्वंयसेवी संस्थेसाठी न्यूड फोटोशूट केले होते.
त्याच्या अशाच काही घटनांचा घेतलेला आढावा जाणून घेण्यासाठी पुढच्या स्लाईडला क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.