आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All England Batmintan Championship : Saurbh Verma In Second Round

ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप: सौरभ वर्मा दुस-या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - भारताचा युवा खेळाडू सौरभ वर्माने ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी विजयी प्रारंभ केला. त्याने शानदार विजय मिळून स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत 43 व्या स्थानी असलेल्या सौरभने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्रिस लेवेर्डेझवर 22-20, 23-21 असा विजय मिळवला. त्याने हा सामना 40 मिनिटांमध्ये जिंकला.

दुसरीकडे महिला दुहेरीत प्रदन्या गद्रे-अश्विनी पोनप्पाने पहिल्या फेरीत विजय मिळवला. भारताच्या या जोडीने सराह थॉमस व करीस्सा टर्नरला 21-8, 21-12 ने पराभूत केले.पुरुष दुहेरीत तरुण कोना व अरुण विष्णूला पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. थायलंडच्या बोडीन इस्सारा व पक्कावतने भारताच्या जोडीला 21-16, 21-18 ने हरवले. मिश्र दुहेरीत सांग जु ली व सो यंग किमने भारताच्या अरुण विष्णू- अपर्णा बालनवर 19-21, 21-9, 21-19 ने मात केली.