आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All England Open Badminton : Saurva, Akshay, Pradnya Enter In Final Round

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन : सौरव, अक्षय, प्रज्ञाचा मुख्य फेरीत प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत मंगळवारी भारताला संमिश्र यश मिळाले. पुरुष एकेरीमध्ये सौरव वर्माने आणि मिश्र दुहेरीत अक्षय देवाळकर व प्रज्ञा गडरे या जोडीने स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीत सौरवसह आनंद पवार आणि गुरुसाई दत्त देखील सहभागी झाला असून त्यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. पवारला पात्रता फेरीतील अव्वल मानांकित इंग्लंडच्या राजीव अउसेपने 20-22, 23-21, 21-7 अशा फरकाने नमवले. सौरववर पात्रता फेरीच्या दुस-या सामन्यात राजीवने 21-13, 21-18 ने मात करत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला.

सौरवने पहिल्या फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या प्राइस लेवरदेजला 22-20, 23-21 असे हरवले होते. दत्तला पहिल्या सामन्यात थायलंडच्या तानोंगसाक सिएनसोमाकेकडून 21-17, 13-21, 21-10 असा पराभव स्वीकारावा लागला.
भारताला दिवसातील दुसरा विजय मिश्र दुहेरीत मिळाला. देवाळकर व गडरे या जोडीने मुख्य फेरीत प्रवेश निश्चित केला. या जोडीने पहिल्या पात्रता फेरीच्या सामन्यात चिनी तैपेईच्या चिया बिन लू आणि बिया लान चांग या जोडीला 21-12, 21-13 असे सरळ सेटमध्ये नमवले. दुस-या सामन्यात हाँगकाँगच्या चून हेई ली आणि होई वाह चाऊ या जोडीला 22-24, 21-14, 21-18 ने पराभूत केले.