Home | Sports | Latest News | all-time-great-test-cricket-team

आयसीसीच्या 'ग्रेटेस्‍ट ऑल टाईम टेस्ट इलेव्हन' संघात चार भारतीय

वृत्तसंस्‍था | Update - Jul 18, 2011, 07:52 PM IST

आयसीसीच्‍या 'ग्रेटेस्‍ट ऑल टाईम टेस्‍ट इलेव्‍हन'मध्‍ये सुनिल गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांना स्‍थान मिळाले आहे.

  • all-time-great-test-cricket-team

    दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑनलाईन वोटिंगद्वारे निवडण्यास आलेल्या 'ऑल टाईम ग्रेट टेस्ट इलेव्हन' संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी ऑनलाईन केलेल्या वोटींगद्वारे हा संघ निवडण्यात आला आहे. या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, लिटील मास्टर सुनील गावसकर आणि १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव यांचा समावेश आहे.
    सचिन तेंडुलकरला फलंदाजीमध्‍ये चवथ्‍या क्रमांकावर चाहत्‍यांनी या संघात पसंती दिली आहे. सर डॉन ब्रॅडमन यांना तिसऱ्या तर ब्रायन लारा याला पाचव्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी पसंती मिळाली आहे. या तिघांनी ग्रेग चॅपेल, वॉली हॅमंड, जॉर्ज हेडली, जावेद मियायंदाद, ग्रॅहम पोलॉक, रिकी पॉन्‍टींग आणि विव्‍हीयन रिचर्ड्स यांच्‍यावर मात करुन या संघात स्‍थान मिळविले आहे. तर कपिल देव हे एकमेव अष्‍टपैलू ठरले आहेत. इयन बोथम, रिचर्ड हॅडली, गॅरी सोबर्स, इम्रान खान आणि फ्रॅन्‍क वॉरेल यांच्‍यापुढे कपिल देव यांना चाहत्‍यांनी पसंती दिली आहे.

    संघ पुढीलप्रमाणे - सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, कपिल देव, सुनीव गावसकर, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा, अॅडम गिलख्रिस्‍ट, कर्टली अॅम्‍ब्रोस

    Follow us on Twitter @ Divyamarathiweb

Trending