आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्‍तीमध्‍ये 200 पुरुष मल्‍लांना अस्मान दाखविलेली \'महिला पैलवान\', बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुस्‍ती फक्‍त पुरुषांचाच खेळ आहे, असा काहींचा गैरसमज असतो. जोर काढणे, शरिरयष्‍टी कमविणे, व्‍यायाम करणे या सर्व गोष्‍टी फक्‍त पुरुषच करु शकतात. असाही काहींचा समज असतो. परंतु आधुनिक काळातच नाहीतर काही वर्षांपूर्वी कुस्‍तीमध्‍ये महिलांनीसुध्‍दा आपली छाप पाडली आहे.

माइल्‍डरेड बुर्के आणि पैनी बेनर या महिलांनी कुस्‍तीमध्‍ये वेगळाच इतिहास घडविला होता. आपल्‍या कौशल्‍याने आणि ताकदीने त्‍यांनी दाखवून दिले, की कुस्‍ती हा फक्‍त पुरषांचाच खेळ नाही. तर महिलासुध्‍दा हा खेळ खेळू शकतात. 1915 ला जन्‍म झालेल्‍या बुर्कें हिने 200 हून अधिक पुरुषांना कुस्‍तीत चितपट केले आहे.

बुर्के सलग 20 वर्षे विश्‍व चॅम्पियन्‍स राहिली. तिच्‍यानंतर या खेळात उतरली ती फॅब्‍युलस मुहाल. सर्वश्रेष्‍ठ कुस्‍तीपटू म्‍हणून फॅब्‍युसन सलग 30 वर्ष विश्‍व चॅम्पियन्‍स राहिली. आज महिलांच्‍या कुस्‍तीला ग्‍लॅमरस लुक दिला जातो आहे. त्‍यांच्‍यांतील कौशल्‍यांपेक्षा त्‍यांच्‍या छोट्या कपड्यांनाच जास्‍त फोकस केले जाते. परंतु पूर्वीच्‍या काळी कौशल्‍यांवर जास्‍त भर दिला जायचा. म्‍हणूनच महिला पुरुषांनासुध्‍दा चितपट करु शकत होत्‍या.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि बघा दिग्‍गज महिला पैलवानांचे डावपेच...