आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगला जागा न दिल्‍यामुळे विनोद कांबळीच्‍या पत्‍नीने लगावली कानशिलात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची पत्‍नी अँ‍ड्रियाविरुध्‍द बांद्रा पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
रविवारी विनोद कांबळी आपल्‍या परिवारसोबत एका हॉटेलमध्‍ये भोजनासाठी गेला असता गाडीच्‍या पार्कींगवरुन एका इसमाशी त्‍याचा वाद झाला. हे भांडण इथेच थांबले नाही तर हॉटेलमध्‍येसुध्‍दा टेबलवरुन दोघांमध्‍ये वाद झाला. त्‍या इसमाने शिवीगाळ सुरु केली. कांबळीची पत्‍नी अँड्रिया समजावणी करायला गेली असता त्‍या इसमाने तिचा हात पकडला व शिवी दिली. त्‍यामुळे रागावलेल्‍या अँड्रियाने त्‍या इसमाच्‍या कानशिलात चपराक मारली. परिवारसोबत शिवीगाळ प्रकरणी कांबळीने पोलिसांत तक्रार नोंदवली तर चपराक मारल्‍यावरुन अँड्रियाविरध्‍दही गुन्‍हा नोंदविण्‍यात आला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आठ वर्षांनंतर कांबळीने पुन्‍हा केले लग्‍न