आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Women's Hockey Competition New In Marathi

महिला हॉकी स्पर्धा: अमेरिकेचा दोन दशकांनंतर उपांत्य फेरीत प्रवेश!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेग- तब्बल दोन दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अमेरिकेचा संघ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. अमेरिकेच्या महिला संघाने जर्मनीचा 4-1 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह अमेरिकेने ब गटातून गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. यासह अर्जेंटिनाची गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर घसरण झाली.

शार्कीचे दोन गोल : शार्की (33, 52 मि.), निचोल्स (39 मि.), रेइप्रेचेंट (43 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर अमेरिका संघाने शानदार विजय मिळवला. हिलाम्मने 60 व्या मिनिटाला जर्मनीसाठी गोल केला. सामन्यातील जर्मनीचा हा एकमेव गोल ठरला. या विजयाच्या बळावर अमेरिकेने दहा गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले. तसेच जर्मनीने चौथे स्थान गाठले.

अर्जेंटिनाकडून इंग्लंड पराभूत
मेरीनो (27 मि.) व रेबेच्ची (70) यांनी प्रत्येकी एक गोल करून अर्जेंटिनाला शानदार विजय मिळवून दिला. अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 ने पराभव केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव
गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा 4-0 ने पराभव केला. भारताचा स्पर्धेतील हा तिसरा पराभव ठरला. यासह भारताची पाचव्या स्थानावर घसरण झाली. भारताला स्पर्धेत केवळ एका विजयावर समाधान मानावे लागले. तसेच भारताचा एक सामना बरोबरीत राहिला होता. तसेच विजयासह ऑस्ट्रेलियाने आपले अव्वलस्थान कायम ठेवले. दुसरीकडे स्पेनने सामन्यात मलेशियाला 4-2 अशा फरकाने पराभूत केले.