आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • American Open Tenis: Nadal, Sarena Entered In Thrid Round

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन ओपन टेनिस: नदाल, सेरेना यांची तिस-या फेरीत धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेला राफेल नदाल, स्विसचा रॉजर फेडरर, जगातील नंबर वन महिला खेळाडू सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. महिला एकेरीत सारा इराणीला पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या सत्रातील हार्डकोर्टवरील विजयी मोहीम अबाधित ठेवताना नदालने पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत ब्राझीलच्या रोजेरियो डुटा सिल्वाचा पराभव केला. त्याने सलग तीन सेटमध्ये 6-2, 6-1, 6-0 अशा फरकाने सामना जिंकला. सातव्या मानांकित रॉजर फेडररने अर्जेंटिनाच्या कार्लोस बेर्लोकला हरवले. त्याने 6-3, 6-2, 6-1 ने विजय मिळवला.


दुसरीकडे महिलांच्या गटात अव्वल मानांकित खेळाडूंचा अद्याप दबदबा कायम आहे. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने कझाकिस्तानच्या गॅलिना वोस्कोवोएवाला पराभूत केले. तिने 6-3, 6-0 अशा फरकाने सरळ दोन सेटमध्ये सामना जिंकला. दुस-या मानांकित व्हिक्टोरिया अजारेंकानेदेखील महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. तिने कॅनडाच्या अलेक्झांड्रा वोज्नियाकीला 6-3, 6-1 ने धूळ चारली.


साराचे स्वप्न भंगले
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सारा इराणीचे स्वप्न भंगले. इटलीच्या या खेळाडूला महिला एकेरीच्या दुस-या फेरीत लाविया पेनेटाने पराभूत केले. तिने 6-3, 6-1 असा सहज विजय मिळवून तिस-या फेरीतील स्थान निश्चित केले. या पराभवासह साराला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तिने पहिल्या सेटमध्ये प्रत्युत्तराची खेळी केली. त्यामुळे तिच्या विजयाचे चित्र दिसत होते. मात्र, लावियाने दमदार पुनरागमन करताना दोन्ही सेट आपल्या नावे केले.


नदालचा शानदार विजय
नदालने पुरुष एकेरीतील दुस-या फेरीचा सामना जिंकून यंदाच्या सत्रात हार्डकोर्टवरील विक्रमी 170 विजय पूर्ण केले. त्याला 92 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत एकमेव ब्रेक पॉइंट मिळाला. त्याने या लढतीत 30 विनर मारले. गतवर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे राफेल नदाल अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. दुस-या मानांकित नदालचा आता तिस-या फेरीत क्रोएशियाच्या इवान डोडिंगशी सामना होईल. त्याने दुस-या फेरीत रशियाच्या निकोले डेवीडँकोचा 6-1, 6-4, 6-4 ने पराभव केला. आता त्याच्यासमोर नदालचे आव्हान असेल.


95 मिनिटांत फेडरर विजयी
दुखापत आणि गचाळ खेळीमुळे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या रॉजर फेडररला दुस-या फेरीत विजय मिळवण्यासाठी 95 मिनिटे झुंज द्यावी लागली. आता त्याला तिस-या फेरीत फ्रान्सच्या एड्रियन मनारिनोच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मनारिनोने अमेरिकेच्या सॅम क्वेरीला 7-6, 7-6, 6-7, 6-4 ने पराभूत केले. उपांत्यपूर्व लढतीत फेडररची गाठ नदालशी पडण्याचे निश्चित झाले आहे.


डुवलचा दारुण पराभव
महिलांच्या गटात 17 वर्षीय अमेरिकेच्या व्हिक्टोरिया डुवलला पराभवाचा सामना करावा लागला. तिला स्लोव्हाकियाच्या डॅनियला हंतुचोवाने सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. तिने 6-2, 6-3 ने सामना जिंकला. अमेरिकेच्या खेळाडूने दुस-या सेटमध्ये चांगली खेळी केली.मात्र, तिला अपयशाला सामोरे जावे लागले.


पेस, सानिया दुस-या फेरीत
भारताचा लिएंडर पेस व सानिया मिर्झाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक मारली. पेसने आपला सहकारी खेळाडू रांदेक स्तेपानेकसोबत पुरुष दुहेरीचा सलामी सामना जिंकला. या जोडीने जार्को निमिनेन-दिमित्री तुरसुनोवचा 6-4, 7-6 ने पराभूत केले. सानियाने महिला दुहेरीत चीनची झेई झेंगसोबत विजयी सलामी दिली. या जोडीने मोनिका पुईग व अनिका बेकचा पराभव केला. सानिया-झेईने 6-2, 6-2 ने सामना जिंकला.


इतर सामन्यांचे निकाल
डेव्हिड फेरर वि. वि. रॉबर्टा बॅटिस्टा (6-3, 6-7, 6-1, 6-2)
जॉन इस्नर वि. वि. गायल मोनाफिल्स (7-5, 6-2, 4-6, 7-6)
रिचर्ड गास्के वि. वि. स्टीफन रॉबर्ट
(6-3, 7-5, 7-5)
यांको टिप्सारेविच वि. वि. डुडी सेला (6-4, 6-7, 6-1)


महिला गट
पेत्रा क्वितोवा वि. वि. बोजाना जोवानोवस्की (6-2, 6-4)
अ‍ॅना इव्हानोविक वि. वि. अलेक्झांड्रा डुलगेरू (6-2, 6-1)
येलेना यांकोविक वि. वि. एलिसा क्लीवैनोवा (6-3, 6-2)
मकारोवा वि.वि. मॅटेक-सॅन्ड (6-4, 6-4)