आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Open Tenis: Pace Reach In Sixth Rank, Sania Go Ahead

एटीपी क्रमवारीत पेस सहाव्या स्थानावर; सानियाची आगेकूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकन ओपनमधील पुरुष दुहेरीचा चॅम्पियन लिएंडर पेसने एटीपी क्रमवारीतील सहाव्या स्थानावर धडक मारली. तसेच देशातील एकेरीचा अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मनने एटीपी क्रमवारीत 13 स्थानांनी प्रगती साधली. यासह तो टॉप-100 खेळाडूंसमीप पोहोचला आहे. सोमदेवने यूएस ओपनच्या पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला होता. त्यानंतर पहिल्या फेरीत अव्वल खेळाडूंवरही मात केली होती. मात्र, त्याला दुस-या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. या कामगिरीसह सोमदेवने 13 स्थानांची प्रगती साधून 101 व्या स्थानी धडक मारली. आशियाई चॅम्पियन सोमदेवने 2011 मध्ये करिअरमधील सर्वोत्कृष्ट 62 वे स्थान गाठले होते. मात्र, खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या सोमदेवला वर्षभर कोर्टपासून दूर राहावे लागले.


पेसने यूएस ओपनच्या उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित बॉब आणि माइक ब्रायन बंधूचा पराभव केला. यासह त्याने क्रमवारीत प्रगती साधली. त्याने सहावे आणि स्तेपानेक रादेकने पाचवे स्थान गाठले. रोहन बोपन्नाने सातवे व महेश भूपतीने दहावे स्थान कायम ठेवले.


सानिया मिर्झा 15 व्या स्थानावर
यूएस ओपनमध्ये उपांत्य फेरीत प्रवेशाचा सानिया मिर्झा व जेई झेंगला क्रमवारीत फायदा झाला. सानियाने एका स्थानाची सुधारणा करताना 15 आणि झेंगने पाचव्या स्थानांवरून 18 व्या क्रमांकावर झेप घेतली.