आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन ओपन टेनिस: पेसला दुहेरीत चौथे मानांकन प्राप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - भारताचा लिएंडर पेस व चेक गणराज्यच्या रादेक स्तेपानेकला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत चौथे मानांकन मिळाले आहे. पेसने रविवारी कॅनडाचा सहकारी खेळाडू डॅनियल नेस्टरसोबत विस्टन-सालेम ओपन टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. दुस-यांदा हे दोघे पुरुष दुहेरीत सोबत खेळले. मात्र, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पेस आपला जुना सहकारी खेळाडू रादेक स्तेपानेकसोबत खेळणार आहे.


या चौथ्या मानांकित जोडीचा सलामी सामना जार्को निइमेन व दिमित्री तुर्सेनोवविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे भारताचा रोहन बोपन्ना व फ्रान्सचा एडवर्ड रॉजर-वेस्लिनला पुरुष दुहेरीत सहावे मानांकन मिळाले. या सहाव्या मानांकित जोडीची गाठ पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडली क्लान व सॅम क्युरीशी पडणार आहे.


मारियन बार्तोली परतणार!
विम्बल्डन चॅम्पियन मारियन बार्तोलीने नुकतीच निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, आता लवकरच कोर्टवर पुनरागमन करणार असल्याचे संकेत तिने दिले. पहिले ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर मारियन बार्तोलीने मागील महिन्यात टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती.


यूएस ओपनसाठी उत्सुक
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया भारताचा लिएंडर पेसने दिली. विस्टन-सालेम ओपनच्या विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. ही विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करीन, असे तो म्हणाला.


सानिया-झेंगला दहावे मानांकन
अमेरिकन ओपनच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा व चीनच्या झेई झेंगला दहावे मानांकन जाहीर झाले आहे. या जोडीचा सामना जर्मनीची अन्निका बेक व पुर्टो रिकोशी होईल. सानिया-झेंगने नुकताच न्यू हेवन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब जिंकला.


अँडी मुरे-योकोविक फायनल अविस्मरणीय : राफेल नदाल
न्यूयॉर्क २ यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन किताबाचा प्रबळ दावेदार राफेल नदाल मागील वर्षी या स्पर्धेत गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र त्याने या स्पर्धेतील सामने टीव्हीवर पाहिले. त्याला अ‍ॅँडी मुरे व नोवाक योकोविक यांच्यातील सामना अधिकच रोमांचक वाटला होता. गतवर्षी पुरुष एकेरीचा अंतिम सामना पाच सेटपर्यंत रंगला होता. हा सामना जिंकून मुरेने करिअरमधील पहिला ग्रॅँडस्लॅम किताब जिंकला होता. तेव्हा मी खेळत नव्हतो आणि माझे पूर्ण लक्ष दुखापतीतून सावरण्याकडे होते. मात्र मी प्रत्येक स्पर्धेचा अंतिम सामना पाहतो, असे 12 ग्रॅँडस्लॅम किताबांचा राजा नदाल म्हणाला.