आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Open Tennis News In Marathi, Roger Federer

अमेरिकन ओपन टेनिस: रॉजर फेडरर, सेरेनाची दुसऱ्या फेरीत धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्सने अपेक्षेप्रमाणे अमेरिकन ओपनची दुसरी फेरी गाठली आहे. त्यांच्याबरोबरच सीसी बेलिस आणि बोरना कोरिक या नवागतांनीदेखील दुसरी फेरी गाठत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फेडररने ऑस्ट्रेलियाच्या मारिन्को माटोसेविकला ६ -३ , ६ -४ , ७ -६ असे पराभूत केले. सेरेना विल्यम्सने प्रतिस्पर्धी टेलर टाऊनसेंडला अवघ्या ५५ मिनिटांत ६ -३ , ६ - १ ने हरवले. दरम्यान, सीसी बेलिस या अवघ्या १५ वर्षांच्या टेनिसपटूने गत उपविजेती डोमनिका सिबुलकोवाला पराभूत करून उपस्थितांना धक्का दिला. त्याचप्रमाणे १७ वर्षीय बोरना कोरिकने तिचा सामना जिंकत दुसरी फेरी गाठत सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.