आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Open Tennis News In Marathi, Yokovich, Andy Maray

अमेरिकन ओपन टेनिस: योकोविक-मरे झुंज रंगणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - येत्या सोमवारपासून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शुक्रवारी या स्पर्धेचा ड्रॉ काढण्या त आला. या वेळी माजी चॅम्पियन नोवाक योकोविक आणि इंग्लंडचा अँडी मरे यांच्या त स्पर्धेचा उपांत्यपूर्व सामना रंगण्याची शक्यता आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम आठमध्ये हे दोघे समोरासमोर येतील. जगातील नंबर वन नोवाक योकोविकला अव्वल मानांकन मिळाले आहे. माजी नंबर वन राफेल नदालने दोन दिवसांपूर्वी च गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडच्या अँडी मरेला आठवे मानांकन मिळाले आहे. त्या ने मागील दोन वर्षांपूर्वी एकेरीचे वि जेतेपद पटकावले होते. त्या नंतर त्या ने २०१३ मध्ये विम्बल्डन टेनसि स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्या नंतर मरेला कोणत्या ही माेठ्या स्पर्धेचा किताब जिंकता आला नाही. त्या मुळे यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा किताब जिंकण्याचा मरेचा प्रयत्न असेल. यासाठी त्याला योकोविकसह फेडररच्या आव्हा नालाही सामाेरे जावे लागण्या ची शक्यता आहे. स्विसकिंग रॉजर फेडररला दुसरे आणि बल्गेरियाच्या ग्रिग्रोर दिमित्राव्हेला सातवे मानांकन देण्या त आले आहे. हे दोन्ही खेळाडू अंितम आठमध्ये समोरासमोर येण्या ची दाट शक्यता आहे.

सेरेना-अ‍ॅना लढणार
अमेरिकेची स्टार खेळाडू सेरेना आणि सर्बियाची अ‍ॅना इव्हा नोविक महलिा एकेरीच्या अंितम आठच्या सामन्यात लढणार आहे. दोन वेळची चॅम्पिय न सेरेनाला यंदाच्या सत्रातील ऑस्ट्रेलियन ओपन टेनि स स्पर् धेच्या चाैथ्या फेरीत अ‍ॅनाने पराभूत केले होते. त्यामुळे आता या पराभवाची परतफेड करण्याची ति ला संधी आहे. तसेच ति सऱ्या मानांकि त पेत्रा क्विताेवाचा उपांत्यपूर्व सामना सातव्या मानांकित युजिनी बुचार्डशी होईल.