आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत नोवाक, मारियाची आगेकूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- माजी चॅम्पियन आणि जगातील नंबर वन नोवाक योकोविक, अँडी मरे, मारिया शारापोवाने मंगळवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत धडक मारली.

आर्थर अॅश स्टेडियममध्ये टेनिसचा थरार पाहण्यासाठी आलेल्या दिग्गजांसमोर अव्वल मानांकित योकोविकने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात अर्जेंटिनाच्या डिएगो स्कावटजमैनचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. त्याने लढतीत ६-१, ६-२, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला.
अव्वल खेळाडूंमध्ये तिसऱ्या मानांकित आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टॅनिलास वांवरिका, इंग्लंडचा अँडी मरे, फ्रान्सचा ज्यो विल्फ्रेंड त्सोंगा, पाचवा मानांकित मिलोस राओनिकनेदेखील पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे.

महिला एकेरीत माजी नंबर वन मारिया शारापोवाने आपल्या देशाच्या मारिया किरीलेंकोला पराभूत केले. तिने ६-४, ६-० ने सामना जिंकला. दुसरीकडे १९ व्या मानांकित व्हिनस विल्यम्सनेही विजयासह आगेकूच केली. चौथी मानांकित अग्निजस्का रांदावास्का, दुसरी मानांकित सिमोना हालेप, जर्मनीची अँजेलिक केर्बरनेही एकेरीच्या सलामी सामन्यात शानदार विजय मिळवला. मरेनेही शानदार विजय मिळवला.