आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Open Tennis: Serena Williams Won Championship Fith Time

अमेरिकन ओपन टेनिस: सेरेना विल्यम्स ठरली पाचव्यांदा चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने सलग दुस-यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने फायनलमध्ये गत उपविजेत्या व्हिक्टोरिया अझारेंकाचा पराभव केला. यासह तिने विजेतेपदावरचे वर्चस्व कायम ठेवले. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे हे करिअरमधील 17 वे ग्रँडस्लॅम ठरले. तसेच तिने पाचव्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची फायनल जिंकली.


अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने बेलारूसच्या अझारेंकाला 7-5, 6-7, 6-1 अशा फरकाने सलग दुस-या वर्षी अंतिम सामन्यात पराभूत केले. तिने दोन तास 54 मिनिटांपर्यंत रंगलेला सामना आपल्या नावे केला.
येत्या 26 सप्टेंबरला सेरेना 32 व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. गत 45 वर्षांपूर्वी, टेनिसचे प्रोफेशनल झाल्यानंतर यूएस ओपन जिंकणारी सेरेना सर्वात वयस्कर पहिली महिला खेळाडू ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मार्गेट कोर्टच्या नावे हा विक्रम होता. तिने 31 वर्षे 55 दिवसांची असताना ही कामगिरी 1973 मध्ये केली होती.


दिग्गज खेळाडूंत सेरेना चौथ्या स्थानी
अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने या विजयासह जगातील महान टेनिस खेळाडूंच्या यादीत चौथे स्थान पटकावले. या दिग्गज महिलांमध्ये मार्गेट कोर्ट 24 ग्रँडस्लॅमसह अव्वल स्थानी आहे. स्टेफी ग्राफने 22 ग्रँडस्लॅमसह दुसरे आणि हेलेन विल्सने 19 ग्रँडस्लॅम जिंकून तिसरे स्थान गाठले. सेरेना आणि मार्टिना नवरातिलोवाने संयुक्तपणे चौथ्या स्थानावर धडक मारली आहे.


सेरेना-अझारेंका पहिला सेट
जबरदस्त फॉर्मात असलेल्या अव्वल मानांकित सेरेनाने पहिला सेट जिंकल्यानंतर सामना एकतर्फी होण्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र, 11 व्या गेममध्ये ब्रेकनंतर स्कोअर 6-5 वर आला. सेरेनाने सर्व्हिससह सेट 7-5 ने जिंकला.


दुसरा सेट अझारेंकाच्या नावे
दुस-या सेटमध्ये निराशाजनक कामगिरीचा सेरेनाला फटका बसला. चांगली सुरुवात करूनही तिला अपयशाला सामोरे जावे लागले. तिने 4-1 ने आघाडी घेतली होती. अझारेंकाने तीन डबल फॉल्ट केले. मात्र, बेलारूसच्या खेळाडूने सेरेनाच्या सुमार खेळीचा फायदा घेऊन आघाडी मिळवली. तिने झुंज कायम ठेवत ट्रायब्रेकरपर्यंत रंगलेला दुसरा सेट जिंकला.


तिसरा सेट सेरेनाने जिंकला
तिस-या सेटमध्येही रोमांचक लढत रंगली होती. अझारेंकाने पाच गेम जिंकून 6-4 ने आघाडी घेतली. सेरेनाने बॅकहॅँड लॉगशॉटसह स्कोअर 6-8 असा केला. तिने चौथ्या गेमनंतर पुनरागमन करताना आघाडी घेतली. तिने दोन वेळा अझारेंकाची सर्व्हिस ब्रेक करून गुण मिळवले. यासह तिने तिसरा सेट आणि सामना जिंकला.


17 ग्रँडस्लॅम क्वीन
05 ऑस्ट्रेलियन ओपन
02 फ्रेंच ओपन
05 विम्बल्डन टेनिस
05 अमेरिकन ओपन