आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेचा स्टार रेयान लोश्चेचा डबल धमाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना- अमेरिकेचा स्टार रेयान लोश्चेने जागतिक जलतरण चॅम्पियनशिपमध्ये 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पटकावले. त्यानंतर त्याने चार गुणे 200 मीटर फ्री स्टाइलमध्ये संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. दुसरीकडे रशियाच्या युलिया इफिमोवाने महिलांच्या 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकच्या उपांत्य फेरीत नवा विश्वविक्रम केला. तिने 29.78 सेकंदांची वेळ काढून अमेरिकेच्या जेसिका हार्डीच्या 2009 मधील 29.80 सेकंदांच्या विक्रमाला मागे टाकले. यासह इफिमोवाने विश्वविक्रम करणार्‍या रिकी पॅडरसनला पिछाडीवर टाकून महिलांच्या 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक आपल्या नावे केले.
डॅनियलने क्रिस्टियनला मागे टाकले : हंगेरीच्या डॅनियल युरताने 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये किताबाची हॅट्ट्रिक केली. त्याने दोन मिनिट 7.23 सेकंदांची वेळ काढून विश्वविक्रम केला. डॅनियलने आॅस्ट्रेलियाच्या क्रिस्टियनचा विक्रम मोडला.