Home | Sports | Other Sports | american tennis indian player out

अमेरिकन टेनिसमधून भारताचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था | Update - Aug 06, 2011, 06:46 AM IST

अमेरिकेत सुरू असलेल्या वॉशिंग्टन टेनिस टुर्नामेंटमध्ये दुस-याच दिवशी भारतीय संघाचे पुरुष गटातील आव्हान संपुष्टात आले.

  • american tennis indian player out

    वॉशिंग्टन - अमेरिकेत सुरू असलेल्या वॉशिंग्टन टेनिस टुर्नामेंटमध्ये दुस-याच दिवशी भारतीय संघाचे पुरुष गटातील आव्हान संपुष्टात आले. दोन दिवसांपूर्वीच एटीपीच्या उपविजेतेपदाचा बहुमान पटकावणा-या सोमदेव देववर्मनला सातव्या मानांकित मार्कोसकडून पराभवाची धूळ चाखावी लागली, तर पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या जोडीच्या पराभवामुळे भारताचे जेतेपदाचे स्वप्न भगले.
    एकेरीत सोमदेवचा पराभव- वॉशिंग्टन टेनिस टुर्नामेंटमध्ये सायप्रसचा सातवा मानांकित मार्कोस विरुद्ध भारताचा सोमदेव यांच्यात पुरुष एकेरीत अटीतटीची लढत झाली. लढतीच्या पहिल्या सेटवर विजेतेपदावरचे आव्हान राखून ठेवण्यासाठी सोमदेवने शर्थीची झुंज दिली. मात्र, वेळीच कोर्टवर ताबा मिळवून मार्कोसने 6-2 गुणांनी बाजी मारून आघाडी घेतली. याच आघाडीला रोखण्यासाठी दुस-या सेटवर सोमदेवने 6-0 गुणांची खेळी केली. तिस-या सेटवर मार्कोसने 7-5 ने विजय संपादन केला.
    रोहन बोपन्ना-कुरेशी स्पर्धेतून बाहेर - पुरुष दुहेरीत भारतीय संघाचे आव्हान राखून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीला अपयशाचा सामना करावा लागला. रोहन बोपन्ना-कुरेशी या इंडो-पाक एक्स्प्रेसची लढत मार्क नोल्स-जेवियर या आघाडीच्या जोडीशी झाली. पहिल्या सेटवर आक्रमक खेळीच्या बळावर इंडो-पाक एक्स्प्रेसने 7-6 ने आघाडी घेतली. मात्र, याच आघाडीच्या खेळीला कायम ठेवण्यात इंडो-पाक एक्स्प्रेसला अपयश आले. परिणामी दुसरा सेट मार्क नोल्स-जेवियर या जोडीने 7-6 गुणांनी जिंकत बरोबरी साधली. तिस-या निर्णायक सेटवरची लढत अधिकच रंगली होती. अखेर मार्क नोल्स-जेवियर या जोडीने 10-3 गुणांची खेळी करून इंडो-पाक एक्स्प्रेसचा पराभव केला.

Trending