आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: त्‍याच्‍या कॅचने केली अशी लिला की बिग बीही हादरले...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचे वेड आता भारताबरोबर विदेशातही पोहोचले आहे. बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्‍चन आयपीएलवर कविता लिहित आहेत तर दुसरीकडे धावपटू योहान ब्‍लॅकने आपल्‍या घरातून कॅ‍रेबियन खेळाडूंना प्रोत्‍साहन देत आहे.

या सेलिब्रिटींना सामन्‍यातील खेळाडूंची जिद्द आकर्षित करीत आहे. प्रत्‍येक संघातील खेळाडू एक-एक धाव रोखण्‍यासाठी आपले योगदान देण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. फलंदाजीत किंवा गोलंदाजीत फ्लॉप ठरलेले खेळाडू जबरदस्‍त कॅच पकडून आपल्‍या संघाला विजय मिळवून देण्‍यात महत्‍वाची भूमिका बजावत आहेत.

अमिताभ बच्‍चन यांनी नुकताच आपल्‍या ट्विटमध्‍ये किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबच्‍या गुरूक्रित सिंगने पकडलेल्‍या कॅचची स्‍तुती केली. इतकेच नव्‍हे तर त्‍यांनी रविवारी हैदराबाद आणि बंगळुरू दरम्‍यान झालेल्‍या रोमांचक सामन्‍यावर कविताही केली आहे.

या रोमांचक सामन्‍याला शब्‍दामध्‍ये मांडताना बिग बी लिहितात,"डेल ने डाली, गेल ने उछाली। RCB की बदहाली, 'सूर्य उदय' की खुशहाली".

किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबच्‍या गुरूक्रित सिंगने पुणे वॉरियर्सच्‍या रॉस टेलरचा एक जबरदस्‍त झेल टिपला. प्रवीणकुमारच्‍या चेंडूवर टेलरचा उडालेली कॅच टिपताना गुरूक्रित सिंगने हवेत शानदार सूर मारला.

टी-20 च्‍या या सहाव्‍या हंगामात आतापर्यंत क्षेत्ररक्षकांनी अनेक शानदार कॅच पकडले आहेत. अजिंक्‍य रहाणे, किरॉन पोलार्ड आणि गुरूक्रित सिंग सारख्‍या युवा क्रिकेटपटूंनी तर सगळयांना चकित केले आहे.

आयपीएलमधील शानदार कॅच पाहण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...