आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद-कार्लसन लढत अनिर्णित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद आणि जगातील नंबर वन मॅग्नस कार्लसन यांच्यातील चौथी लढत मंगळवारी अनिर्णित राहिली. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत हा सामना रंगला होता. तब्बल 64 चालींपर्यंत ही लढत चालली. अखेर दोघांनाही अनिर्णिताला सामोरे जावे लागले. दोघांनीही तुल्यबळ खेळी करत बाजी लढवली. आता स्पर्धेतील आठ फे-या शिल्लक आहेत. त्यामुळे भारताचा आनंद व कार्लसन यांची आगामी फेरीतील लढती अधिक रोमांचक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पाचव्या लढतीचा सामना शुक्रवारी होणार आहे.