आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदने घेतले पुतीनसोबत चहापाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झाला. बुधवारी आनंदने गेलफांदला नमवून पांचव्यांदा विश्वविजेता झाला. या यशानंतर पुतीन यांनी आनंदला घरी चहापानासाठी आंमत्रित केले होते. 'आनंदच्या भेटीमुळे मी खुप आनंदी आहे. विश्वविजेत्यासमोर उभे असल्याचा मला सार्थ अभिमान वाटत होता. ही भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. प्रत्येकाचे महत्त्व हे त्याच्यातील कलागुणांवर आधारित असते,' असे या वेळी पुतीन यांनी म्हटले.