आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anand Vs Carlsen: Viswanathan Anand India, World Chess Champion

गुडबाय 2013: बुद्धिबळात वर्षाची सुरुवात चांगली, तर अखेर वाईट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी चालू हंगाम आशा-निराशेचा राहिला. टाटा स्टील स्पर्धेद्वारे वर्षाची चांगली सुरुवात करणार्‍या विश्वनाथन आनंदला वर्षाच्या शेवटी शेवटी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने हरवले आणि विश्वविजेतेपदही हिसकावले.
आनंदकडून 2013 मध्ये तितकी चांगली कामगिरी होऊ शकली नाही. वर्षाच्या सुरुवातीस भारताला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद मिळाले आणि आनंदला पुन्हा एकदा विश्वविजेतेपद आपल्याकडे ठेवण्याची संधी मिळाली. त्याने त्यापूर्वी 2000, 2008, 2010 आणि 2012 मध्ये विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता. 75 व्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या वँग हाओने आश्चर्यकारक प्रदर्शन करत आनंदसह तिसरे स्थान पटकावले. खरं तर आनंदच्या कामगिरीला येथूनच घरघर लागली; परंतु त्यानंतर लगेचच आनंदने ग्रेन्क बुद्धिबळ क्लासिक ट्रॉफीत जर्मनच्या अर्कादीज नैदित्सचवर विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. झुरिचमध्ये रशियाच्या ब्लादिमीर क्रॅमनिकला हरवून आनंदने दुसर्‍या स्थानावर झेप घेतली.