सचिनने शतकांच्या शतकाचा / सचिनने शतकांच्या शतकाचा विचार करू नये - अँडरसन

वृत्तसंस्था

Jul 17,2011 04:28:29 PM IST

लंडन - इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिकयुद्धाला सुरवात झाली आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्न अँडरसनने सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शतकांच्या शतकांचा विचार करू नये, अशी टीका केली आहे. अँडरसनच्या मते सचिन तेंडुलकरचे ध्यान कोणीच विचलीत करू शकत नाही.

अँडरसन म्हणाला, सचिनच्या शतकाची एवढी चर्चा होत असल्याने त्याचा परिणाम सचिनच्या आणि संघाच्या खेळावर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या शतकाबाबत चर्चा होत असली तरी तो या सामन्यात ही कामगिरी करू शकणार नाही. सचिनवर शतकांचे शतक पूर्ण करण्याचा दबाव असणार आहे.

लॉर्डसवर २१ जुलैपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात युवराज सिंहच्या जागी सुरेश रैनाचा समावेश करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रैना सध्या चांगली कामगिरी करीत असल्याने त्याला संघात स्थान देण्यात येईल. रैना आणि युवराज यांच्यात संघात स्थान मिळविण्यासाठी लढाई सुरु आहे.
follow us on twitter @ Divyamarathiweb

X
COMMENT