आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेलबर्न- एमसीजी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत गेल्या दोन दिवसांत वेगवान गोलंदाजांनी धमाका उडवला. या गोलंदाजांनी दोन दिवसांत एकूण 19 बळी घेतले. यातील अठरा बळी वेगवान गोलंदाजांच्या नावे आहेत. तसेच सामन्यात सर्वाधिक पाच विकेट मिशेल जॉन्सनने घेतल्या.
इंग्लंडच्या गोलंदाजीमुळे अडचणीत सापडलेल्या कांगारूंना शुक्रवारी दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात 9 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाच्या बी. हॅडिनने नाबाद 43 धावा काढल्या. गोलंदाजीत इंग्लंडकडून जेम्स अॅँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. टीम ब्रेसनने सामन्यात दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात 255 धावा काढल्या. आॅस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सनने सर्वाधिक पाच बळी घेतले. इंग्लंड टीम अद्याप 91 धावांनी आघाडीवर आहे.ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर क्रिस रॉजर्सने दुसरा दिवस गाजवला. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेताना 61 धावांची खेळी केली. त्याने 171 चेंडूंत आठ चौकार ठोकले.
जॉन्सनचे पाच बळी
तत्पूर्वी सकाळी इंग्लंडने सहा बाद 226 धावांवरून दुसºया दिवशी खेळायला सुरुवात केली. मात्र, या टीमला आपल्या धावसंख्येत अवघ्या 29 धावांची भर घालता आली. यासाठी इंग्लंडला चार गडी गमवावे लागले. पाच विकेट घेणा-या जॉन्सनने पीटरसनला 71 धावांवर बाद केले. तसेच त्याने ब्रेसनन (1), ब्रॉड (11) या दोघांनाही तंबूत पाठवले. जॉन्सनने 63 धावा देत पाच गडी बाद केले. इंग्लंडच्या माँटी पानेसरची विकेट नॅथन लियोनने घेतली. पीटर सिडल, लियोन आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : पहिला डाव : 255 धावा, ऑस्ट्रेलीया: पहिला डाव : 9 बाद 164 धावा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.