आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जडेजा व अँडरसन शिवीगाळ प्रकरण : आयसीसीने बीसीसीआयचे अपील फेटाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - जेम्स अ‍ॅँडरसनला शिवीगाळप्रकरणी क्लीन चिट देण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नेमलेल्या समितीच्या विरोधात भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) केलेले अपील आयसीसीने फेटाळल्याने भारताला धक्का बसला आहे.

समितीने दिलेल्या निर्णयाबाबत समाधानी असल्याचे कारण देत आयसीसीने बीसीसीआयचे अपील फेटाळले आहे. समितीचे आयुक्त गॉर्डन लुईस यांनी पुरावे नसल्याने दोन्ही खेळाडू या प्रकरणात दोषी नसल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयसीसचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांच्याकडे अपिल केले. मात्र, आयसीसीने न्यायिक आयुक्त लुईस यांची पाठराखन करताना बीसीसीआयचे अपील लगेचच फेटाळून लावले.

प्रकरण लांबवणे व्यर्थ
या प्रकरणाची सुनावणी योग्य प्रकारे झाली असल्याने आता पुन्हा त्यावर अपील करून ते प्रकरण लांबवणे व्यर्थ असल्याचे मत झाल्याने अपील फेटाळल्याचे रिचर्डसन यांनी म्हटले आहे. एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले होते. यानंतर दोघांना क्लीन चिट देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.