आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andrew Strauss Caught On Air Abusing Kevin Pietersen During Rest Of The World XI Vs MCC Match

लॉर्डसवरील ऐतिहासिक सामन्यादरम्यान अँड्र्यू स्ट्रॉसने पीटरसनला दिली शीवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - क्रिकेटची पंढरी लॉर्डसच्या द्विशताब्दीनिमित्त शनिवारी एमसीसी इलेव्हन विरुद्ध विश्व एकादश यांच्यात एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. जगभरातील दिग्गज एकत्र क्रिकेट खेळत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रयू स्ट्रॉसने केव्हिन पीटरसनला शीवी दिली. मीडिया रिपोर्टसनुसार, स्ट्रॉस कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला असताना त्याने पीटरसनवर अभद्र टिप्पणी केली. स्ट्रॉसचे अपशब्द रेकॉर्ड देखील झाले. या सामन्यात एमसीसीने विश्व एकादशवर सात विकेटने विजय मिळविला.
चॅनल आणि स्टॉसने मागितली माफी
स्ट्रॉस कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा सहकारी निक नाइटसोबत बोलत होता तेव्हा त्याने पीटरसनबद्दल अपशब्द वापरले. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या फॉक्स स्पोर्टसवर पाहाणार्‍या प्रेक्षकांना तेव्हा धक्काच बसला. स्ट्रॉसचे वक्तव्य ब्रिटीश टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आले नाही. स्काय स्पोर्टस या चॅनलवरुन हा सामना दाखवण्यात आला होता. त्यांनी स्ट्रॉसच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. चॅनलने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे, 'खेळातील ब्रेकच्या दरम्यान काही अपशब्दांचा वापर झाला आणि ते जगभर ऐकले गेले. आम्ही त्याबद्दल माफी मागतो.' त्यानंतर स्ट्रॉसनेही सार्वजनिकरित्या माफी मागितली.
ब्रिटनमध्ये नाही, ऑस्ट्रेलियात ऐकायला मिळाली स्ट्रॉसची अभद्र कॉमेंट
डेली टेलीग्राफ वृत्तपत्रातील वृत्तानुसार, 'इंग्लंडचा माजी कर्णधार स्ट्रॉस कॉमेंट्री बॉक्समध्ये मागे बसून सहकारी नाइटसोबत बोलत होता. जेव्हा ब्रेकसाठी खेळ थांबला होता तेव्हा त्याने पीटरसनबद्दल अपशब्द वापरले. त्याचे वक्तव्य ब्रिटनच्या दर्शकांना ऐकायला मिळाले नाही, मात्र ऑस्ट्रेलियाच्या फॉक्स स्पोर्टसच्या दर्शकांनी ते ऐकले. कारण ऑस्ट्रेलियामध्ये फॉक्स स्पोर्टस् वर तेव्हा जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या.'

छायाचित्र - लॉर्डसवर मेलबर्न क्रिकेट क्लब विरुद्ध विश्व एकादश यांच्या सामन्यादरम्यान चाहत्यासोबत फोटो काढताना केव्हिन पीटरसन.