Home | Sports | Expert Comment | andrew strauss statement on sachin tendulkar

सचिनला शतकापासून रोखण्यासाठी गोलंदाज तयार - स्ट्रॉस

वृत्तसंस्था | Update - Jul 18, 2011, 01:41 PM IST

सचिन तेंडुलकरला शतकांच्या शतकापासून रोखण्यासाठी आमचे गोलंदाज तयार असल्याचे इंग्लंडचा कर्णधार ऍण्ड्रयू स्ट्रॉस याने म्हटले आहे.

 • andrew strauss statement on sachin tendulkar

  लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला शतकांच्या शतकापासून रोखण्यासाठी आमचे गोलंदाज तयार असल्याचे इंग्लंडचा कर्णधार ऍण्ड्रयू स्ट्रॉस याने म्हटले आहे.

  स्ट्रॉस म्हणाला, सचिनला रोखण्यासाठी आमच्या गोलंदाजांनी तयारी केली आहे. मैदानावर त्याला रोखणे हेच आमचे लक्ष्य असणार आहे. सचिनचा संघात समावेश असला तरी त्याने पुढील संघासाठी धोक्याचे असते.

  भारतीय संघाच्या प्रदर्शनाविषयी बोलताना लक्ष्मण म्हणाला, सराव सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन पाहता काळजी करण्यासारखे काही नाही. इंग्लंडविरुद्ध लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. प्रत्येक खेळाडूला कशी कामगिरी करायची आहे, याची जाणीव आहे. इंग्लंडला त्यांच्या मायभूमीत पराभूत करण्यासाठी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची मदत होणार आहे. फ्लेचर यांच्या कारकिर्दीतील प्रशिक्षक असतानाचा हा १०० वा कसोटी सामना असल्याने आमच्यासाठी ही गौरवाची बाब आहे. ते अनुभवी असल्याने त्यांचा आम्हाला फायदाच होणार आहे.

  भारत आणि सॉमरसेट यांच्यात झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित अवस्थेत संपला. सॉमरसेटने दुसऱ्या डावात २६० धावांवर डाव घोषीत केला होता. तर, भारताने दुसऱ्या डावात बिनबाद ६९ धावा केल्या.
  follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending