आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफानच्‍या चौकाराने भडकला 'कांगारू', पाहा व्हिडिओ...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील सामने जसे रंगतदार ठरतात. त्‍याप्रमाणेच दोन्‍ही संघातील खेळाडूंमध्‍येही मैदानात चांगलीच झुंज रंगते. हा सामना भारतात असो किंवा ऑस्‍ट्रेलियात वाद हे होणारच. गेल्‍या काही वर्षातील भारत-ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील सामन्‍यांवर नजर टाकल्‍यास आपल्‍याला हे लक्षात येईल.

असेच काहीसे 2007 मधील भारतातील मालिकेवेळेस झाले होते. टीम इंडियाचा फलंदाज इरफान पठाणने अँड्रयू सायमंड्सला पुढे सरसावून चौकार मारला. यावर भडकलेल्‍या सायमंडसने इरफानला शिव्‍या दिल्‍या. त्‍यामुळे चिडलेल्‍या इरफान पठाणला माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्‍याला शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, सायमंड्सने शिव्‍या देण्‍याचे थांबवले नाही. यावर इरफाननेही त्‍याच्‍यासोबत वाद घालण्‍यास सुरूवात केली.
वातावरण गंभीर होत असल्‍याचे पाहून पंच अलीम दर आणि ऑस्‍ट्रेलियाचा तत्‍कालीन कर्णधार रिकी पॉंटिगने इरफानचा राग शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला. पाहा व्हिडिओ...