आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँडी मुरे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अँडी मुरेने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.त्याने स्विसच्या रॉजर फेडररला पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक उपांत्य सामन्यात धूळ चारली.तिस-या मानांकित मुरेने दुस-या मानांकित फेडररवर 6-4, 6-7, 6-3, 6-7, 6-2 अशा फरकाने विजय मिळवला.फायनलमध्ये त्याचा मुकाबला जगातील नंबर वन खेळाडू नोवाक योकोविकसोबत होईल. या पराभवासह फेडररचे 18 वा ग्रँडस्लॅम किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. मुरेने (2010, 2011) तिस-या ंदा फायनलमध्ये धडक मारली.

रोमांचक सामन्यात 2-2 ने बरोबरी मिळवल्यानंतर मुरेने आक्रमक सर्व्हिस आणि जोरदार ग्राउंड स्ट्रोक्स मारले. या सुरेख खेळीच्या बळावर त्याने स्विस मास्टरला पराभूत केले. मुरेने विजयाचा फारसा आनंद व्यक्त केला नाही. शांतपणे चाहत्यांना अभिवादन करून तो कोर्टवरून बाहेर आला.

25 वर्षीय मुरेने पहिल्यांदा फेडररला ग्रँडस्लॅममध्ये पराभूत केले. दोन्ही खेळाडूंनी चार तास रंगलेल्या लढतीत उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले. फेडररने लढतीत दोन वेळा बरोबरी मिळवली. मात्र, त्याला मुरेला रोखण्यात अपयश आले. इंग्लंडच्या खेळाडूने दमदार सुरुवात करताना पहिला सेट 45 मिनिटांमध्ये 6-4 अशा फरकाने जिंकला. दुसरा सेट 58 मिनिटे रंगला होता. हा सेट 7-6 ने जिंकून फेडररने लढतीत 1-1 ने बरोबरी मिळवली. त्यानंतर तिसरा सेट मुरेने 36 मिनिटांमध्ये 6-3 अशा फरकाने जिंकून आघाडी मिळवली. चौथ्या सेटमध्ये फेडररने बाजी मारून पुन्हा बरोबरी मिळवली. चौथा सेट 71 मिनिटांपर्यंत चालला. पाचव्या सेटमध्ये स्विसचा किंग बाजी मारेल, असे काहीसे चित्र होते. मात्र, मुरेने पुनरागमन करून फेडररची सर्व्हिस ब्रेक केली आणि सोपा विजय संपादन केला.