आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँडी मरेला अजिंक्यपद, राफेल नदालला उपविजेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला अॅंडी मरे माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. इंग्लंडच्या मरेने अंतिम सामन्यात जगतील माजी नंबर वन राफेल नदालचा पराभव केला. त्याने ६-३, ६-२ अशा फरकाने सरळ दाेन सेटमध्ये एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याने फ्रेंच अाेपनच्या किताबासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले अाहे. फ्रेंच अाेपन येत्या २४ मे पासून सुरू हाेणार अाहे.

स्पेनच्या राफेल नदालने विजेतेपदासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला अंतिम सामन्यात समाधानकारक खेळी करता अाली नाही.
दाेन्ही तुल्यबळ खेळाडूंची पहिल्या सेटमध्ये चांगलीच झुंज रंगली हाेती. मात्र, यात सरस खेळी करून मरेने बाजी मारली. यासह त्याने लढतीमध्ये अाघाडी घेतली. त्यानंतर त्याने ही लय अबाधित ठेवली. यासाठी नदालने जाेरदार झुंज दिली. मात्र, मरेच्या सुरेख खेळीसमाेर त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. याचा फायदा घेत मरेने दुसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला. तसेच इंग्लंडच्या मरेने माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धेच्या किताबावर अापला वर्चस्व प्रस्थापित केले.

बाेपन्नाला दुहेरीचा किताब
भारताचा राेहन बाेपन्नाने माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब पटकावला. त्याने अापला सहकारी राेमानियाच्या फ्लाेरिन मेरेजासाेबत हे यश संपादन केले. बाेपन्ना-मेरेजाने अाक्रमक सर्व्हिसच्या बळावर ८५ मिनिटांमध्ये अजिंक्यपदावर नाव काेरले. या जाेडीने अंतिम सामन्यात मात्काेवस्की-झिमाेनिजिकचा पराभव केली. इंडाे-राेमानिया जाेडीने ६-२, ६-७, ११-९ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली.
बातम्या आणखी आहेत...