Home | Sports | Other Sports | andy murrey enter in quarter final

फ्रेंच ओपनमध्ये मरे उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Agency | Update - Jun 01, 2011, 01:35 PM IST

चौथा मानांकित इंग्लंडच्या ऍण्डी मरेने पुरुष एकेरीत अतिशय रोमांचक लढतीत सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोएस्कीला पराभूत करून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

 • andy murrey enter in quarter final

  murray_258पॅरिस - चौथा मानांकित इंग्लंडच्या ऍण्डी मरेने पुरुष एकेरीत अतिशय रोमांचक लढतीत सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोएस्कीला पराभूत करून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येथे त्याचा सामना अर्जेंटिनाचा बिगरमानांकित जुआन इग्रेसियो चेला याच्याशी होईल. मरेने उपउपांत्यपूर्व सामन्यात व्हिक्टरवर ७-५, ४-६, ४-६, ६-३, ६-२ ने विजय मिळविला. पाच सेटपर्यंत चाललेली ही लढत अतिशय तुल्यबळ अशीच ठरली. महिला दुहेरीत अमेरिकेच्या वानिया किंग आणि कजाकिस्तानची बारोस्लावा शेवेडोवा यांनी उपांत्य फेरी गाठली. मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या जर्मिलना
  गाडोसोवा आणि ब्राझीलच्या थॉमस बेलुसी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

  मरेने घाम गाळला
  इंग्लंडचा खेळाडू ऍण्डी मरेला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. मरेचा पहिला सेट टायब्रेकरपर्यंत खेचला गेला. ही लढत तब्बल पाच सेटपर्यंत रंगली. मरेने सामन्यात १२ ऐस मारले, तर ट्रोएस्कीने ४ खेचले.

  वानियाशेवेडोवा महिला दुहेरीच्या अंतिम चारमध्ये
  तिसरी मानांकित वानिया किंग आणिया यारोस्लावा शेवेडोवा या जोडीने रशियाच्या नादिया पेट्रोव्हा आणि ऑस्ट्रेलियाच्या ऍनेस्ताशिया रोडियोनोवा यांना ७-५, ३-६, ६-२ ने नमविले. या विजयासह या जोडीने अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे.Trending