आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंका क्रिकेट : मॅथ्यूजकडे कर्णधारपद, तर चंडीमलकडे उपकर्णधारपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो - श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याची श्रीलंकेच्या कसोटीसह एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, दिनेश चंडीमलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. चंडीमलकडे टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. याआधी कसोटी व वनडेसाठी महेला जयवर्धने कर्णधारपद भूषवत होता तर, मॅथ्यूजकडे टी-20 चे कर्णधारपद होते.

ऑस्ट्रेलिया दौ-यात खराब कामगिरी झाल्याने व वय झाल्यामुळे आपण कर्णधारपदासाठी इच्छुक नसल्याचे महेलाने याआधी स्पष्ट केले होते. त्यामुळे लंकेच्या निवड समितीने भविष्याचा वेध घेताना नवा व तरुण कर्णधार निवडण्याचा विचार केला. त्यातच 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये विश्वकरंडक स्पर्धा होत त्यादृष्टीने विचार करुन मॅथ्यूजची निवड करण्यात आली आहे. मॅथ्यूजची निवड ही एक वर्षासाठी असल्याचे सांगितले तरी 2015 पर्यंत तरी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये श्रीलंका आपल्या देशात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. मॅथ्यूजने आतापर्यंत 31 कसोटी आमि 90 एकदिवसीय सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीची चुणूक दाखविली आहे.