आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Kumble News In Marathi, Mumbai Indians, IPL 7, Divya Marathi

मुंबईत पोहोचताच अनिल कुंबळेची वानखेडेकडे धाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई इंडियन्स संघाचे ‘मेंटॉर’ अनिल कुंबळे यांनी मुंबईत दाखल होताक्षणी वानखेडे स्टेडियमकडे धाव घेतली. ‘वानखेडे स्टेडियम आमच्यासाठी नेहमीच सुदैवी ठरले आहे. दुबईतील सामन्यांमध्ये आमची फलंदाजी अपयशी ठरली. सर्वच प्रमुख फलंदाजांपैकी एकाचाही सूर लागला नाही. 125 च्या जवळपास धावसंख्या उभारल्यानंतर आम्ही प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणूच शकलो नाही. वानखेडे स्टेडियमच्या लढतींमध्ये आम्ही उद्या 170 ते 180 धावसंख्येच्या जवळपास धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणता येईल व आमचा विजयाचा दुष्काळही संपविता येईल, अशी प्रतिक्रिया कुंबळेंनी या वेळी व्यक्त केली.

वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर माजी कसोटीपटू सुधीर नाईक म्हणाले, ‘खेळपट्टी ठणठणीत आहे. यावर 170 ते 180 धावसंख्या उभारण्यास हरकत नाही. यूएईमधील मैदाने मोठी होती. सीमारेषा 75 ते 80 यार्डापर्यंतही काही ठिकाणी लांब होती. आपल्या येथे ही सीमारेषा एवढी लांब नसेल.
मुंबईत तर 70 ते 72 यार्डापर्यंतच असल्यामुळे चौकार व षटकार अधिक पाहावयास मिळतील. शिवाय वानखेडे स्टेडियमचे ‘आऊटफील्ड’ वेगवान आहे. मात्र या मैदानावर प्रतिस्पर्धी संघालाही धावसंख्या उभारण्याची तेवढीच संधी असेल.’

मुंबई इंडियन्सने आपली सलामीची लढत ‘एज्युकेशन फॉर ऑल’ या आपल्या मालकीण नीता अंबानी यांच्या योजनेला अर्पण केली आहे. मुंबई-पंजाब या सलामीच्या लढतीसाठी 7 ते 14 वयोगटातील उपेक्षित वर्गातील सुमारे 18 हजार मुलांना हा सामना विनामूल्य दाखवण्यात येणार आहे.