आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी ट्रॉफीसाठी अंकितची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - औरंगाबादचा गुणवंत खेळाडू अंकित बावणे आगामी इराणी चषकात खेळणार आहे. नुकत्याच झालेल्या यंदाच्या सत्रातील रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्याला इराणी चषकासाठी शेष भारताकडून खेळण्याची संधी मिळाली.
हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली नुकताच शेष भारताचा संघ जाहीर करण्यात आला. या वेळी टीममध्ये युवा खेळाडू अंकित बावणेसह महाराष्‍ट्राचा केदार जाधव, मुंबईचा अनुरीत सिंगची निवड करण्यात आली.
अंकितने दोन दिवसांपूर्वी झालेल्या कर्नाटकविरुद्ध रणजीच्या फायनलमध्ये दोन डावांत अर्धशतकी खेळी केली. तसेच केदारने रणजी ट्रॉफीत सर्वाधिक 1223 धावा काढल्या. त्याने दहा सामन्यांत ही उल्लेखनीय कामगिरी केली.
जम्मू-काश्मिरचा अष्टपैलू खेळाडू परवेज रसूलला शेष भारत संघात स्थान मिळाले आहे. परवेज ऑफस्पिनर असून, तो मधल्या फळीचा उत्तम फलंदाज आहे.
आता कर्नाटकविरुद्ध शेष भारताकडून खेळणार
औरंगाबादच्या अंकित बावणेला पुन्हा एकदा कर्नाटकविरुद्ध चारदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली. इराणी चषकात 9 फेब्रुवारीपासून शेष भारत आणि रणजी चॅम्पियन कर्नाटक यांच्यातील लढतीला प्रारंभ होईल. या सामन्यात अंकित बावणे शेष भारतचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शेष भारत टीम : हरभजन सिंग (कर्णधार), जीवनज्योत सिंग, गौतम गंभीर, बाबा अपराजित, केदार जाधव, अंकित बावणे, अशोक डिंडा, पंकज सिंग, वरुण अ‍ॅरोन, परवेज रसूल, अनुरीत सिंग, नटराज बेहरा, मनदीप सिंग.