आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankita Raina Tastes First Win On WTA Circuit, News In Marathi

अंकिता रैनाची डब्ल्यूटीए सर्किटवर विजयी सलामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नानचांग- भारताची नंबर वन टेनिसपटू अंकिता रैनाने बुधवारी डब्ल्यूटीए सर्किटवर विजयी सलामी दिली. यावरचा आपल्या टेनिस करिअरमधील हा तिचा पहिला विजय ठरला.

भारताच्या अंकिताने दमदार विजयाने चीनमधील नानचांग येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेला सुरुवात केली. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या जुनरी नमीगाताचा पराभव केला. तिने सलामी सामन्यात 6-4, 2-6, 6-2 अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने दुसर्‍या फेरीत धडक मारली. माजी आयटीएफ चॅम्पियन अंकिताचा आता स्पर्धेतील दुसर्‍या फेरीतील सामना हाँगकाँगच्या लिंग झांगशी होईल.

अंकिताने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. मात्र, या वेळी जपानच्या खेळाडूने तिला चांगलेच झुंजवले. दरम्यान, आक्रमक सर्व्हिस करत तिने पहिला सेट जिंकून लढतीत आघाडी घेतली. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये जुनरीने दमदार पुनरागमन केले. सलग गुणांची कमाई करत तिने दुसरा सेट आपल्या नावे करून लढतीत बरोबरी साधली.

त्यानंतर तिसर्‍या निर्णायक सेटमध्ये अंकिता आणि जुनरी यांच्यातील लढत चांगलीच रंगली होती. दरम्यान, सरस खेळी करताना अंकिताने सलग गुण मिळवून जपानच्या खेळाडूचा बाजी मारण्याचा प्रयत्न उधळून लावला. यासह तिने तिसरा सेट जिंकून सामना आपल्या नावे केला.
‘हा विजय माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. यामुळे मला स्वप्नपूर्ती करता आली,’ असेही ती म्हणाली.