आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक सभेत मीच अध्यक्षस्थान भूषवणार : श्रीनिवासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थान भूषवणार असल्याचा दावा बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी केला. येत्या 29 सप्टेंबरला चेन्नईत क्रिकेट मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यसमितीची बैठक पार पडली. श्रीनिवास यांनी वार्षिक अहवालावर स्वाक्षरी आणि अकाउंटच्या मुद्दय़ावर सभेचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यानंतर अंतरिम अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी उर्वरित बैठकीचे नेतृत्व केले. बैठकीनंतर क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष शुक्ला म्हणाले की, येत्या 29 सप्टेंबरपर्यंत दालमिया यांचे अंतरिम अध्यक्षपद कायम राहणार आहे.


माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत
‘मी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत नेतृत्व करणार आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. कोणती अडचण आहे ? मी काय चुकीचे केले? माझ्यावर काय आरोप आहेत हे अद्याप मला समजले नाही, असे यावेळी बैठकीत श्रीनिवासन यांनी स्पष्ट केल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.