आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Antanul Gold, Rahul Silver Got In National Acharya Ranking

राष्‍ट्रीय तिरंदाजी रॅकिंग स्पर्धेत अंतनूला सुवर्ण, राहुलला रौप्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - साई येथे सुरू असलेल्या चौथ्या राष्‍ट्रीय तिरंदाजी रॅकिंग स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या निवड चाचणीच्या रिकर्व्ह प्रकारात अंतनू दासने अचूक लक्ष्य भेदत सुवर्णपदक पटकावले.


ऑलिम्पिकपटू राहुल बॅनर्जीने फॉर्मात येत रौप्यपदकाचा वेध घेतला. तिरंदाज कपिलने जयंत तालुकदार सोबत झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सरस कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवला. कंपाउंड प्रकारात संदीप कुमारने सुवर्ण आणि अभिषेक वर्माने रौप्यपदक आपल्या नावे केले. कंपाउंडचा टॉप खेळाडू रजत चौव्हानला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.


रिकर्व्ह गटातील भारताचा अव्वल खेळाडू ऑलिम्पियन जयंत तालुकदार स्पर्धा सुरू असताना उपांत्य फेरीत खराब कामगिरी झाल्यामुळे निराश झाल्याचे स्पष्ट दिसत होते.


कंपाउंडला मिळणार लवकरच विदेशी कोच
भारताचा कंपाउंड संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. आता भारतीय प्रशिक्षकांच्या जोडीला विदेशी कोच येणार आहे. राष्‍ट्रीय संघटनेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाला असून यूएसएचे डी. व्हॉइट यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. ते लवकरच संघासोबत जोडले जातील असे संघटनेचे सरचिटणीस अनिल कामनेनी म्हणाले.