आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Anurag Thakur Takes A Dig N Srinivasan Asks Him To Reveal Names Of Suspected

संशयास्पद बुकींची यादी सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांना द्या : ठाकूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रीनिवासन यांच्या एककल्ली कारभारानंतर आता बीसीसीआयमधील अंतर्गत कलहाचे पडघम वाजू लागले आहेत. श्रीनिवासन यांच्या पाठीराख्यांना महत्त्वाच्या समित्यांपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या अध्यक्ष दालमिया व सचिव अनुराग ठाकूर यांच्या चेन्नई सुपरकिंग्जच्या मालकी हक्कांच्या हस्तांतरणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा खडाजंगी झाली. श्रीनिवासन यांनी अनुराग ठाकूर यांचे बुकींशी संबंध असल्याचे वृत्त उघड करून २४ तास उलटत नाहीत तोच आता अनुराग ठाकूर यांनीही खुल्या पत्राद्वारे श्रीनिवासन यांना आवाहन करून आव्हान दिले आहे. श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनामुळेच आयसीसीने आपली बदनामी करणारे पत्र बीसीसीआयला पाठवले. त्याउपर ते पत्र प्रसिद्धिमाध्यमांपर्यंत कसे पोहोचवले जाईल याचीही काळजी घेतली, असा आरोप करून अनुराग ठाकूर यांनी श्रीनिवासन यांना संशयास्पद बुकींची यादी सर्वप्रथम आपल्या घरातील व्यक्तींना देण्याची गरज आहे (ज्यांचे बुकींशी असलेले संबंध सिद्ध झाले आहेत) असाही सल्ला देऊन चिमटा काढला आहे.

श्रीनिवासन यांच्या इशाऱ्यामुळेच आयसीसीने ठाकूर व कथित बुकी करण गिल्होत्रा यांचे संबंध असल्याचे पत्र बीसीसीआयला पाठवले, असा आरोप आहे. आयसीसीने त्याच पत्रात दिलेली माहिती खात्री न करता गोळा केली असल्याचेही म्हटले आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे, करण गिल्होत्रा यांना मी पंजाब व आजूबाजूच्या राज्यांत क्रिकेटविषयक कार्य करणारे आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून ओळखतो. त्यांच्या कथित किंवा बुकी असल्याबद्दलच्या संशयास्पद हालचालींची मला कल्पना नाही. अशा अन्य संशयास्पद बुकींची यादी श्रीनिवासन यांनी माझ्याशी व माझ्या सहकाऱ्यांना द्यावी, अशी विनंतीही ठाकूर यांनी केली आहे.

श्रीनिंना खाेचक सल्ला
खात्री न करता काढण्यात आलेल्या या संशयास्पद बुकींची यादी मला व सहकाऱ्यांना दिली असती तर अशा व्यक्तींपासून दूर राहण्याची काळजी घेतली असती. ती माहिती आपल्या कुटुंबीयांनाही उपयुक्त ठरली असती, असाही खोचक सल्ला ठाकूर यांनी श्रीनिंना दिला आहे.
नीरज गुंडेची चालबाजी
आश्चर्याची गोष्ट अशी की, आयसीसीला मिळालेली संशयास्पद बुकींची यादी नीरज गुंडे या व्यक्तीने आयसीसीच्या निदर्शनास आणून दिली. योगायोगाची गोष्ट अशी की, हेच नीरज गुंडे आयसीसीच्या या पत्राची माहिती दिल्लीतील प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींना पुरवत होते.
बातम्या आणखी आहेत...