आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूर - ढाका मध्ये झालेल्या टी-20 विश्व चषकामध्ये श्रीलंकेसोबत झालेल्या अंतीम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहली मंगळवारी अनुष्का शर्माला भेटायला गेला. नंतर दोघेही खेजडला किल्लावर फिरायला गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही सोबत फिरताना दिसले.
याआधीही काही महिन्यांपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड दौ-यावर असताना अनुष्का न्यूझीलंडला गेली होती. दोघांचेही सोबत- सोबत फिरतानाचे फोटो प्रसिध्द झाले होते. भारतीय संघ ढाका येथे रवाना होण्यापूर्वी अनुष्काला भेटायला विराट श्रीलंकेला गेला होता.
जाहीरातीचा बनाव
विराट दिल्ली हून एअर इंडियाच्या विमानाने दुपारी 12:25 वाजता जोधपूर ला पोहोचले. त्यांनतर एक तासाने अनुष्का मुंबईहून जेट एअरवेजच्या विमानाने जोधपूरला पोहोचली. तोपर्यंत खूप वेळ विराट अनुष्काची प्रतीक्षा करत होता. प्रसिध्दी माध्यमांपासून लपण्यासाठी विराट जाहीरातीच्या शुटींगसाठी आल्याची अफवा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर तेथे अनुष्का पोहोचताच सगळे पितळ उघडे पडले. कारण पोलिस आणि प्रशासनाने शुटींगसाठी कुणालाच परवाणा दिला नव्हता.
पुढील स्लाइडवर पाहा, विराट आणि अनुष्काची छायाचित्रे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.