आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अनुष्काने चीयर करूनही विराटचा संघ \'गळपटला\', बसमध्येही फुलले प्रेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: बंगळुरूत विराट कोहलीला चीयर करताना त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा)

यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) धूळ चारत सनरायझर्स हैदराबाद टीमने आयपीएलच्या आठव्या सत्रात शानदार विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे विराट कोहलीला चीयर करण्‍यासाठी त्याची गर्लफ्रेंड अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित होती. लढतीदरम्यान अनुष्काने विराट आणि त्याच्या संघाला सपोर्ट केला. परंतु, तरी देखील आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला.
हैदराबाद टीमने सामन्यात यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर आठ गड्यांनी मात केली. यासह हैदराबाद टीम स्पर्धेत विजयी ट्रॅकवर आली आहे. या टीमचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला.
कोहलीची 41 धावांची खेळी...
यापूर्वी, कोलकात्यातील ईडन गार्डनवर आरसीबीने केकेआरचा 3 विकेट राखून धुव्वा उडवला होता. परंतु आपल्या घरच्या मैदानावर आरस‍ीबीची सनराइजर्स हैदराबादने धुळधाण केली. अनुष्काच्या उपस्थितीत विराटने शानदार फलंदाजी केली. त्याने 41 धावा काढल्या. कोहली केकेआरविरुद्ध फक्त 13 केल्या होत्या. परंतु सनराइजर्स हैदराबादविरुद्ध विराटने 37 चेंडूत 4 चौकार आणि दोन षटकाच्या मदतीने 41 धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान, टीमच्या बसमध्येही अनुष्का विराटसोबतच दिसली.
पुढील स्लाइडवर पाहा, विराटला चीयर करणार्‍या अनुष्काचे Photo...