अहमदाबाद - मोटेरा स्टेडियमवर गुरुवारी (दि. 6 नोव्हेंबर) भारतविरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामना होणार आहे. दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे आज (बुधवार) भारतीय क्रिकेटपटू
विराट कोहलीचा वाढदिवस आहे. विराटचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याची प्रेयसी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का ही देखील अहमदाबादेत पोहोचली आहे. विराट आणि अनुष्का एकाच हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा ही हॉटेल नोवाटेलमध्ये आठव्या मजल्यावरच्या खोलीत थांबली आहे. सोमवारी रात्री 11 वाजता अनुष्काने हॉटेलमध्ये मागच्या दरवाज्याने प्रवेश केला. उल्लेखनिय म्हणजे विराट स्वत: अनुष्काला घ्यायला गेला होता. दोघे हॉटेलमध्ये आले तेव्हा विराटने स्वत:चा चेहरा रुमालाने झाकला होता.
टीम इंडियाही नोवाटेल हॉटेलमध्येच...
भारतीय संघ देखील हॉटेल नोवाटेलमध्येच थांबला आहे. संपूर्ण संघ 9 व्या मजल्यावर थांबला असून विराटची प्रेयसी अनुष्का ही आठव्या मजल्यावरील एका खोलीत थांबली आहे. अनुष्का हॉटेलमध्ये थांबल्याचे कोणालाही समजू नये, यासाठी हॉटेलच्या सर्व कर्मच्या-यांना विशेष सूचना देण्यात आल्याचे समजते.
विराटने मानले चाहत्यांचे आभार....
विराट कोहलीचा वाढदिवस आज (बुधवारी) नोवाटेल हॉटेलमध्येच सेलिब्रेट केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर स्टेडियमच्या आकाराचा केक कापून कोहलीला शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीने
आपल्या ऑफिशियल '
फेसबुक' पेजवरून चाहत्यांचे आभार मानले आहे. ‘आपल्या शुभेच्छांमुळे मी आनंदी झालो असून मी आपले आभार मानतो’ अशी पोस्ट कोहलीने केली आहे.
अनुष्का आणि विराटची झलक पाहा पुढील स्लाइड्सवर क्लिक करून...