आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Argentina, England Players Will Play In Jaipur Polo

अर्जेंटिना, इंग्लंडचे खेळाडू जयपुरामध्‍ये होते असलेल्या पोलो स्पर्धेत खेळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - स्थानिक रामबाग ग्राउंडवर सोमवारपासून पोलो स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या मैदानावर तब्बल महिनाभर पोलो स्पर्धांचा धमाका उडणार आहे. यंदाच्या सत्रात अर्जेंटिना आणि इंग्लंडचे स्टार खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी अर्जेंटिनाचा एक क्लब जयपुरात दाखल झाला आहे. 18 जानेवारी रोजी या क्लबचा सामना यजमान टीमसोबत होईल. इंग्लंडचे खेळाडू स्पर्धेत विविध टीमकडून खेळणार आहेत.
या सत्रात एकूण पाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 30 डिसेंबरपासून स्पर्धांना सुरुवात होईल. या स्पर्धा 2 फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहेत. सोमवारी कोटा चषकाने या स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा 30 डिसेंबर ते 5 जानेवारी 2014 पर्यंत चालणार आहे.
पोलो स्पर्धांचे वेळापत्रक
स्पर्धा गोल दिनांक
कोटा चषक 06 30 डिसेंबर ते 5 जानेवारी
गोल्डवास चषक 08 6 ते 12 जानेवारी
माउंट शिवालिक चषक 10 13 ते 19 जानेवारी
सवाई भवानीसिंग चषक 10 20 ते 26 जानेवारी
सिरमूर चषक 14 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी
अली बंधूंचे खास आकर्षण
हैदराबादचे बशीर व हमजा हे अली बंधू आपले नशीब आजमावणार आहेत. बशीर हा गत स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणार खेळाडू ठरला होता.
गोदारा, कलान बंधूही सहभागी
ध्रुवपाल व मनुपाल या गोदारा बंधूंशिवाय अंगद, उदय या कलान बंधू, भारतीय संघाचे माजी कर्णधार विशालसिंग देखील स्पर्धेत सहभागी होतील.