आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arjun Tendulkar Out Of Under 14 Team Due To Bad Performance

अंडर- 14 संघातून ज्‍युनिअर तेंडुलकरला वगळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला अंडर-14 च्‍या संभावीत 30 सदस्‍यीय संघातून वगळण्‍यात आले आहे. या संभावित संघाची निवड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्‍या (एमसीए) ज्‍युनिअर निवड समितीने केली आहे.

निवड चाचणीवेळच्‍या खराब कामगिरीमुळे ज्‍युनिअर तेंडुलकरला वगळण्‍यात आले. आता काहीच दिवसांत सुरू होण्‍यापूर्वी ऑफ सिझन कॅम्‍पमध्‍ये तो सहभाग घेऊ शकणार नाही. गेल्‍यावर्षी अर्जुन अंडर 14 टीमचा सदस्‍य होता. परंतु, त्‍याला एकही सामना खेळता आला नव्‍हता.

एमसीएतर्फे उन्‍हाळयामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या सामन्‍यात अर्जुनला एकदाही 50च्‍या वर धावा जमवता आल्‍या नव्‍हत्‍या. त्‍यानंतर निवड समितीने पुन्‍हा एकदा चाचणी घेतली. त्‍यावेळीही अर्जुनची कामगिरी खराब राहिली होती. त्‍याचबरोबर मैदानातील त्‍याच्‍या हालचालीही सुस्‍त अशा होत्‍या.