आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन तेंडुलकरची निवड योग्यच...!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अहमदाबाद येथे 20 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत होणा-या पश्चिम विभागीय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या मुंबई संघात कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा झाला नसून सर्व खेळाडूंची निवड गुणवत्तेनुसार केली असल्याचे स्पष्टीकरण निवड समितीचे समन्वयक आणि असोसिएशनचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी दिले आहे.

दै. ‘दिव्य मराठी’ला यासंदर्भात माहिती देताना शेट्टी म्हणाले, ‘मंगळवारी याबाबत आढावा घेण्यासाठी 14 वर्षांखालील निवड समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला रमेश वाजगे (अध्यक्ष), राजू शिर्के, प्रशांत सावंत, भीमेश शहा व पी. व्ही. शेट्टी (समन्वयक) हजर होते.’ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांनी 14 वर्षांखालील मुंबई क्रिकेटपटूंच्या संघनिवडीत अन्याय झाल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या संघनिवडीचा फेरआढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

‘भूपेन लालवानीने केलेल्या 398 धावांच्या खेळीचे भांडवल केले जात आहे. भूपेन लालवानी याने त्या धावा निवड चाचणीसाठी निश्चित केलेल्या स्पर्धेत केल्या नाहीत. त्यानंतर लालवानीने कोणत्याही स्पर्धेत एकही चांगली खेळी केली नाही,’ असे पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले.