आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arrest Of Sreesanth Is Shameful For Kerla Says Shashi Tharoor

श्रीसंतच्‍या अटकेने केरळचे चाहते दु:खी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- केरळचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत फिक्सिंग प्रकरणात अडकला आणि त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर केरळच्या तमाम क्रिकेट चाहत्यांना आतोनात दु:ख झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांनी व्यक्त केली.

दिल्ली पोलिसांनी श्रीसंतवर मोक्का लावल्याचा निर्णय योग्य आहे का, असा प्रश्‍न पत्रकारांनी थरूर यांना विचारला असता ते म्हणाले, हा निर्णय न्यायालयाला घ्यायचा आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये घडलेले प्रकरण कोणत्याही युवा चाहत्याला आवडणार नाही. जे घडले ते चांगले झाले नाही. आता केरळचा संजू सॅमसन केरळच्या क्रिकेट चाहत्यांसाठी भविष्याचा स्टार ठरू शकतो. त्याच्याकडे तशी गुणवत्ता आहे, असेही ते म्हणाले.