आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेसी रायडरच्‍या प्रकृतीत सुधारणा, मारहाण प्रकरणी एकाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्‍टन - न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी आज एका व्यक्तीला अटक केली असून आणखी एकाचा शोध घेण्‍यात येत आहे. दरम्‍यान, रायडरच्‍या प्रकृतीत सुधारणाही झाल्‍याची माहिती डॉक्‍टरांनी दिली आहे.

रायडरचा व्‍यवस्‍थापक अ‍ॅरॉन क्‍ली याने सांगितले की, शुक्रवारपासून रायडरच्‍या प्रकृतीमध्‍ये सुधारणा जाणवत आहे. त्‍याने उपचारांना प्रतिसाद दिला आहे. परंतु, अजूनही तो आयसीयूमध्‍येच आहे. त्‍याच्‍या फुफ्फुसाला दुखापत झाल्‍यामुळे कृत्रिम श्‍वासोच्‍छवासावर ठेवण्‍यात आला आहे. तर डोक्‍याला झालेल्‍या जखमेबद्दल आताच काही सांगता येणार नाही, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

रायडरला मारहाण केल्या प्रकरणी एका 20 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची पोलिस चौकशी करण्यात येत आहे. त्‍याचाच एक 37 वर्षीय नातेवाईकही या हल्‍ल्‍यात सहभागी होता. त्‍याचा शोध घेण्‍यात येत आहे. सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये रायडरने वाद घातलेला नसल्‍याचे दिसून आले. मारहाणा करणा-या व्‍यक्तीसोबत तो हात मिळविताना दिसला. त्‍यानंतर त्‍याच व्‍यक्तीने रायडरचा पाठलाग करुन बेदम मारले. तो रायडरवर मोठ्याने ओरडत बारच्‍या बाहेर पडला होता. हा वाद रायडरने स्‍वतःहून सुरु केला होता की त्‍याला उद्युक्त करण्‍यात आले, याचाही तपास करण्‍यात येत आहे.