आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arsenal Team Member Suaarej Get 51 Million Dollars Offer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्सेनल संघाच्या सुआरेजला 51 दशलक्ष डॉलर्सची ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आर्सेनल संघ व्यवस्थापनाने लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू लुइस सुआरेजला विक्रमी 51 दशलक्ष पाउंडच्या रकमेची ऑफर देण्याची तयारी दर्शवली आहे. लिव्हरपूलचे व्यवस्थापक ब्रेंडन रॉजर्स आणि त्यांच्या क्लबचे सहकारी सुआरेझवर नाराज आहेत. कराराची अट लिव्हरपूलने तोडल्याबाबत त्याने थेट माध्यमांकडे जाऊन भाष्य केले होते. लिव्हरपूलच्या वरिष्ठांनी त्याला कठोर शब्दांत सुनावले. फर्नांडो टोरेसच्या बदल्यात दोन वर्षांपूर्वी लिव्हरपूलला चेल्सीकडून पन्नास दशलक्ष डॉलर्सची रक्कम मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर 51 दशलक्ष पाउंडची आर्सेनलची ऑफर ही सर्वाधिक रकमेची ठरण्याची चिन्हे आहेत.


मँचेस्टर युनायटेडचा 3-1 ने पराभव
सेव्हिला क्लबने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात मॅँचेस्टर युनायटेडचा 3-1 ने पराभव केला. विटोलो (21 मि.), मार्काे मरीन (25 मि.) आणि ब्रायन राबेल्लो (90 मि.) यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला. दुस-या हाफमध्ये अ‍ॅन्टोनो वालेंसियाने (65 मि.) मँचेस्टर युनायटेडकडून केलेला गोल व्यर्थ ठरला. घरच्या मैदानावर युनायटेडला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.


सामन्याच्या 21 व्या मिनिटाला पाहुण्या टीमने पहिला गोल केला. विटोलोने ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने पहिला फिल्ड गोल करून संघाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मार्को मरीनने अवघ्या चार मिनिटांत संघाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्याने 25 व्या मिनिटाला सुरेख मैदानी गोल केला. दुसरीकडे सेव्हिलाने पहिल्या हाफमध्ये मोठी आघाडी घेतली होती.