आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालिका फ्लॉप, खेळाडू हिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा लेखक मिलान कुंदरा यांच्या मते, भारत-बांगलादेश मालिका उद्देशहीन आणि सहन न होणारी होती. त्यांचे म्हणणे योग्य आहे कारण तीनपैकी दोन सामन्यांवर पावसाचे सावट होते. त्यापैकी एका सामन्यात षटके कमी करण्यात आली आणि शेवटचा सामना तर रद्दच करण्यात आला होता. मालिका फ्लॉप झाली असली, तरी टीम इंडियाचे अनेक खेळाडू (स्टुअर्ट बिन्नी, रॉबिन उथप्पा इत्यादी) हिट ठरले आहेत.

मालिकेचा विचार केला तर लक्षात येईल की, बांगलादेशच्या खेळात अजूनही काहीच प्रगती नाही. बांगलादेशच्या संघात स्पर्धात्मक कौशल्य नव्हते. दरम्यान, येथील स्टेडियमही रिकामेच दिसत होते. बांगलादेशने मागच्या चार पाच महिन्यात श्रीलंकेविरुद्ध मालिका आणि ट्वेटी-20 विश्वचषकाचे आयोजन केले आहे. बांगलादेश-भारत मालिका सुरू झाली तेव्हा फुटबॉल विश्वचषक सुरू झाले होते.
सा-या जगताचे लक्ष फुटबॉलकडे होते त्यामुळे या मालिकेकडे बांगलादेशी क्रीडाप्रेमींनी पाठ फिरवली. जेव्हा विश्वचषक किंवा ऑलिम्पिकसारखी स्पर्धा असेल तेव्हा कोणत्याही खेळाची मालिका होऊ नये, या मताचा मी नाही. असा विचार करणेसुद्धा मला चुकीचे वाटते. सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू असतानादेखील इंग्लंड आणि श्रीलंका तसेच वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. भारतीय संघसुद्धा पुढच्या आठवड्यापासून इंग्लंड दौ-यावर जाणार आहे. शिवाय, सोमवारपासून विम्बलडन टेनिस स्पर्धासुद्धा सुरू होणार आहे. असोत, मी पुन्हा क्रिकेटकडे वळतो. बांगलादेश-भारत मालिका प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली असली तरी टीम इंडियाच्या काही खेळाडूंवर निवडकर्त्यांचे लक्ष गेले असेल. यात स्टुअर्ट बिन्नी, अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, मोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा असेल. त्यामुळे या खेळाडूंना विश्वचषकासाठी त्यांचा दावा मजबूत करण्यासाठी आणखी संधी मिळाव्यात, अशी अपेक्षा करायला हवी. सध्या टीम इंडिया इंग्लंड दौ-यावर जात आहे. या वेळी कर्णधार धोनीला कठीण आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र, त्यात तो यशस्वी ठरेल अशी अपेक्षा आहे.