आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीसीसीअायची सत्ता अाता खेळाडूंच्या हाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील अाठवड्यांपासून रंगत असलेल्या चर्चेला क्रिकेटमधील त्रिदेव सचिन तेंडुलकर, साैरव गांगुली अाणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या बीसीसीअायच्या सल्लागार समितीमधील नियुक्तीने पूर्णविराम मिळाला. कारण, हे भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू अाहेत. या तिघांच्या नियुक्तीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बदलाच्या रूपाने पाहिले जात अाहे. खेळाडूंच्या हिताचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार अाता या तिघांना देण्यात येण्याची शक्यता अाहे अाणि एक महान खेळाडू रवी शास्त्रीला टीमच्या संचालकपदी ठेवण्यात अाले अाहे. शनिवारी राहुल द्रविडची भारत अ अाणि १९ वर्षांखालील टीमच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात अाले.
अशाप्रकारे बीसीसीअायची पूर्ण सत्ता अाता खेळाडूंच्या हाती गेली अाहे.

भविष्यात विराट काेहली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती अाहे, असे मला वाटते. त्याच्यावर अाता कसाेटीच्या नेतृत्वाची जबाबदारी साेपवण्यात अाली. त्याच्यावर अाता नव्याने भारतीय क्रिकेटला पुढे अाणण्याची धुरा अाहे. सचिन, साैरव अाणि लक्ष्मणची याेग्य वेळी साथ मिळाल्याने काेहली हा नशीबवान अाहे. त्याच्यात उत्साह अाणि काही तरी करून दाखवण्याची उर्मी अाहे. वरिष्ठांच्या अनमाेल मार्गदर्शनातुन टीमला एक याेग्य दिशा देण्याची क्षमता काेहलीमध्ये अाहे. सचिन अाणि गांगुली हे टीम इंडियाचे कर्णधार हाेते.त्यामुळे प्रतिस्पर्धींच्या अाव्हानाला कप्रकारे परतावून लावायचे, याचे मार्गदर्शन हे तिघेही काेहलीला करू शकतात.

बीसीसीअायने अद्याप या तिघांचेही अधिकार स्पष्ट केले नाहीत. मात्र, याचे चित्रदेखील अाता लवकरच स्पष्ट हाेणार अाहे. तसेचही शास्त्री हे टीमचे डायरेक्टर अाहे. याचा अर्थ की, तेही खेळाडूंच्या अधिक जवळ अाहे. शास्त्री देखील काेहलीला चांगले मार्गदर्शन करू शकतात. विराटने शास्त्रींच्या भूमिकेची स्तुती केली हाेती. काेहलीला याेग्य वयात टीमच्या नेतृत्वाची संधी मिळाली अाहे. अाता २६ व्या वर्षी कर्णधार झाल्यास त्याचे स्वागतच केले जाणार अाहे. ताे अद्याप युवा अाहे. त्याच्यात टीमला याेग्य दिशा मिळवून देण्याची माेठी क्षमता अाहे. तसेच स्वत:च्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याचीही जाण त्याला अाहे. त्याच्यात जबरदस्त
प्रतिभादेखील अाहे. त्याचा फायदा टीमला हाेऊ शकताे. त्यातुनच भारताची फलंदाजी अधिक मजबुत झाली अाहे.

विराट काेहली हा मागील चार वर्षांपासून टीम इंडियासाेबत विदेशचा दाैरा करत अाहे. या दाै-यात ताे टीमसाठी मॅच विनरची भुमिका बजावत अाहे. त्याला त्याच्याकडे टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी अाहे. त्यामुळे त्याला अाता कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी लागणार अाहे.