आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Mahindrasingh Dhoni By Ayyaz Memon, DIvya Marathi

दिव्य मराठी विश्‍लेषण: पर्यायच नसल्यामुळे धोनीला धक्का नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडमधील टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीचे कर्णधारपद काढून घ्या आणि कोच डंकन फ्लेचरची हकालपट्टी करा अशी मागणी पुढे येत आहे. धोनीविरुद्ध भलेही संताप असो, पण त्याच्या कर्णधारपदाला धोका नाही. कारण त्याची कामगिरी नसून, टीममध्ये पर्यायाचा अभाव हे आहे. सध्याच कर्णधारपद दिल्यास उपकर्णधार विराट कोहलीचा खेळ दबावापायी बिघडण्याची भीती आहे. दुसरा दावेदारही दिसत नाही. तथापि, फ्लेचरची हकालपट्टी मात्र शक्य आहे.

फ्लेचरची हकालपट्टी कशामुळे : फ्लेचर 2011पासून कोच आहेत. या काळात सहापैकी पाच विदेशी कसोटी सामने भारत हरला. खेळाडूंचे फिटनेसही बिघडले. प्रोग्रेस रिपोर्ट निगेटिव्ह आहे. निकालांवरच कोचचे मूल्यमापन होते. फिफा वर्ल्ड कपमध्ये ब्राझीलचा पराभव होताच कोच स्कोलारींची हकालपट्टी झाली होती.

खेळाडूंचे आर्थिक नुकसान : खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू घटणार नाही. परंतु पराभव झालेल्या खेळाडूवर कोणी पैसा लावत नाही. वर्ल्ड कप जवळ आहे. अशा वेळी जाहिरातींच्या करारांतून मिळणारा पैसा घटू शकतो.

गंभीर, रोहित बाहेर : विराट कोहली, चेतेश्वर पुजाराला धोका नाही. गंभीर आणि रोहितला घरचा रस्ता
दाखवला जाऊ शकतो. गंभीरची वाईट कामगिरी धवनचे स्थान शाबूत ठेवू शकते. गोलंदाजीलाही धोका नाही. जडेजाच्या ऑलराऊंडर क्षमतेवर प्रश्नचिन्ह उठले. देशांतर्गत मालिकांत तर तो राहीलच, परंतु विदेशांत सामना जिंकून देऊ शकणा-या ऑलराऊंडरचा शोध वेग घेईल. भारताचा पुढचा परदेश दौरा म्हणजे ऑस्ट्रेलियाचा नोव्हेंबरमध्ये आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत वन डे विश्वचषकही ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्येच आहे.