आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On New Boss Of Indian Cricket Team By Ayyaz Memon

शिस्तीसाठी नव्या बॉसची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय कसोटीसंघाच्या इंग्लंडमधील लाजिरवाण्या कामगिरीचा लवकरच अहवाल तयार होणार आहे. मात्र, यात टीमचे नवे संचालक रवी शास्त्री यांची कोणतीही भूमिका नसेल. रवीची केवळ वनडे मालिकेपुरती नियुक्ती मर्यादित असेल. सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कार्यशिस्त लावली जावी, यासाठीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रवी शास्त्रीची नियुक्ती केली अाहे. या सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर काेणीतरी लक्ष ठेवणारा एक बॉस आहे. यामुळे या सर्व खेळाडूंना खेळाविषयी अिधक गंभीर राहावे लागणार अाहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. बीसीसीअायने प्रशिक्षक डंकन फ्लेचरच्या सपाेर्ट स्टाफमधील दाेघांना (ट्रेवर पेनी, दावेस) विश्रांती देऊन तीन माेठे बदल केले अाहेत. अागामी िदवसांमध्ये काय हाेईल, याचे चांगले संकेत या बदलातून मिळत अाहेत. फ्लेचरही यातून बरेच काही शिकले अाहेत. कार्यशिस्तीचा उद्देश चांगला असला तरच टीमचे भले हाेईल. तसेच या सुमार कामगिरीवर प्रभावी उपाययाेजना करता येईल. शास्त्री यांनी अनेक वेळा संकटमाेचकाची भूमिका प्रभावीपणे बजावली अाहे. टीम इंडियाच्या सध्या परिस्थितीसाठी शास्त्रींची नियुक्ती अिधकच प्रभावी ठरणारी अाहे. ते अनेक दिवसांपासून टीम इंडियाच्या सुमार कामगिरीमुळे पैनीवर नजर ठेवून अाहे. ते काेच अाणि खेळाडूंसाठी प्राेत्साहन देणारे व्यक्तिमत्त्व अाहे. चांगली कामगिरी करत असतानाच अचानक भारतीय संघाच्या खेळीचा दर्जा कशामुळे खालावला, याचा शाेध घेण्याचे माेठे अाव्हान शास्त्रीसमाेर अाहे. संचालक म्हणून त्यांना प्रामाणिकपणे या समस्यांचे विश्लेषण करावे लागणार अाहे. त्यांच्यासमाेर भविष्यात राेडमॅप तयार करण्याचेही माेठे अाव्हान अाहे. काही स्टार अनुभवहीन असल्यामुळेच भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या मते, शास्त्रींनी मांडलेले हे मत अर्धसत्य अाहे. माझ्याकडे असे म्हणण्याचा तर्कदेखील अाहे. इंग्लंड संघाच्या वयाची सरासरी ही टीम इंडियासारखी अाहे. इंग्लंड टीमच्या ज्याे रूटने २०१२ मध्ये भारताविरुद्ध कसाेटीत पदार्पण केले हाेते. ताे सध्याच्या मालिकेत सर्वािधक धावा काढण्यात यशस्वी ठरला अाहे. इंग्लंड टीमचा कुक, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्राॅड घरच्या मैदानावर यशस्वी ठरले अाहेत. इंग्लंड संघ लाॅर्ड््सवर पहिले अाॅस्ट्रेिलयाकडून, त्यानंतर श्रीलंकेकडून अािण अाता भारताकडून कसाेटीत पराभूत झाला अाहे. मात्र, इंग्लंडने मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. भारतीय संघदेखील पुनर्निर्माणच्या याच परिस्थितीतून जात अाहे. अाता संघात प्रत्युत्तराच्या क्षमतेचा विकास हाेईल. भारतीय संघ विदेश दाैऱ्यात दक्षिण अाफ्रिका, न्यूझीलंड अाणि इंग्लंडकडून पराभूत झाला अाहे. मात्र, इतर संघ याच्याविरुद्ध दुसऱ्या देशांच्या खेळपट्टीवर विजय मिळवण्यात यशस्वी झाले अाहेत. उदाहरणार्थ -दक्षिण अाफ्रिकेला अाॅस्ट्रेिलयाविरुद्ध, वेस्ट इंडीजला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून, इंग्लंडला घरच्या मैदानावर श्रीलंकेकडून अािण श्रीलंकेला अापल्याच मैदानावर अाॅस्ट्रेिलयाविरुद्ध पराभवाला सामाेरे जावे लागले.
अायपीएलच्या विषयावरूनच सध्या भारतीय संघावर लाजिरवाण्या कामगिरीसाठी प्रचंड टीका केली जात अाहे. भारतीय संघातील स्टार खेळाडूंनाच अायपीएलपासून दूर ठेवले जावे, जेणेकरून या खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा कायम राहील अाणि ते सर्व कसाेटीत चांगली खेळी करतील, असा सल्लाच न्यूझीलंडच्या स्टीव्हन फ्लेमिंगने िदला अाहे. फ्लेमिंगच्या या मताशी मी सहमत नाही. जगातील अव्वल अाफ्रिका अािण अाॅस्ट्रेिलया संघांतील बरेचसे खेळाडू सातत्याने अायपीएलमध्ये खेळतात. या खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा खालावला नाही तर अामच्याच खेळाडूंची शैली सुमार कशी काय झाली? यासाठी या सर्वच खेळाडूंनी सातत्याने देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने खेळायला हवे, असे माझे मत अाहे. हे खेळाडू रणजी अाणि इतर स्पर्धा खेळूनच कसाेटीसाठीची अापली क्षमता वाढवू शकतात. त्यातूनच त्यांचा विकास साधला जाईल. अापल्या संघात द्रविड, सचिन, व्हीव्हीएस लक्ष्मण, साैरव गांगुली अाणि जहीर खान नाहीत. शेवटी या सर्वांची उणीव दूर करण्यासाठी सध्याच्या नवाेदित खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धा खेळायला हवी. बीसीसीअायच्या दूरदृष्टीतूनच भारतीय संघाचा उद्धार शक्य अाहे.