आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिस्त लावण्याची जबाबदारी पंचावर सोपवण्यात यावी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँडरसन-रवींद्र जडेजाच्या वादामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका सध्या चर्चेत आल्यास अधिकच लाजिरवाणे ठरेल. कारण या मालिकेत आतापर्यंत चांगल्या प्रकारचे क्रिकेट पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हा वाद या रोमांचकतेवर पाणी फेरू शकतो. हा वाद पहिल्या कसोटीतील आहे. यावर मोठी चर्चाही झाली आहे की काय हे प्रकरण आपसात मिटवले जाऊ शकते? निश्चितच, असे घडलेले योग्यच ठरेल. मात्र, या प्रकरणात बेपर्वाई केली गेली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनानेही गरजेपेक्षा अधिक प्रतिक्रिया दिली, अशी चर्चा इंग्लंडच्या प्रसारमाध्यमांमध्ये आहे. या वादाच्या ठिकाणी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा स्वत: होता, हाच माझ्या चिंतेचा विषय आहे. मध्यस्थी करून त्याने हे प्रकरण जागेवरच का मिटवले नाही? हे प्रकरण अधिक विस्तारण्याची काय गरज होती? धोनी हा व्यावहारिक आणि चकित करणा-या निर्णयांसाठी ओळखला जातो. शेवटी 2011 मध्ये तर त्याने इयान बेलला दुस-यांदा फलंदाजीसाठी बोलावले होते, ज्या वेळी पंचांनी त्याला बाद दिले होते.

अँडरसन आणि जडेजा यांच्यात काय झाले, हे रहस्यमय आहे. 22 जुलै रोजी आयसीसीच्या वतीने नियुक्त ज्युडिशियल कमिशनर गार्डन लुइस दोन्ही पक्षांची सुनावणी करणार आहेत. याच दिवशी या प्रकरणातील सत्यता बाहेर येईल. तसेही खेळाडूंचे आक्रमक होणे, हे चुकीचे नाही. कारण त्यामुळे खेळातील रोमांचकपणा अधिक वाढतो. आंतरराष्‍ट्रीय स्तरावर खेळाला अधिकच महत्त्व आहे. याच स्तरावर खेळ हा स्वत:, देश आणि संघाच्या गौरवाचा मुख्य पैलू असतो आणि लहानसहान गोष्टींवर केल्या जाणा-या वादविवादाचा परिणाम चाहत्यांमधील नकारात्मकतेवर होतो. खेळातील विनोद ही सामान्य गोष्ट आहे. कोणाचाही अवमान होणार नाही यासाठी विनोदालाही मर्यादा आहेत. माझ्या मते, खेळाडूंमधील वाढत्या वादांमुळे पंच आणि सामनाधिका-यांमधील अक्षमता स्पष्ट होते. हे पंच परिस्थितीत हस्तक्षेप करत नाहीत. खास करून मैदानावर असलेल्या पंचांना अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची संधी असते. मात्र, या वेळी ते आपल्या अधिकाराचा वापर करत नाहीत. तसेही तिसरे-चौथे पंच, रेफ्री यांची तांत्रिकतेच्या आधारे मैदानावरील प्रत्येक निर्णयावर कडक नजर असते. अनेक वेळा निर्णय उलटवले जातात आणि हे केवळ त्याच्या निर्णयामुळेच नाही, तर मैदानावरील परिस्थितीवरही अवलंबून असते. खेळाडू तर नेहमीच आक्रमक असतात. मात्र, पहिली अशी प्रकरणे वेगळी असायची. यापूर्वी मैदानावर शिस्त ठेवण्याची जबाबदारी पंचांवर असायची. फ्रेंच चेस्टर, डिकी बर्ड आणि एवढेच काय, आमचे छोटे रिपोर्टरही मोठ्या अधिकाराने अशी प्रकरणे मिटवतात. मैदानावर झालेल्या वादाकडे पंचांनी केलेले दुर्लक्ष हे अधिकच चुकीचे आहे. हे प्रकरण त्याच वेळी मिटवले गेले तर त्याची अधिक चर्चा होत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अनेक वेळा तर हे खेळासाठी घातकही ठरते.
सध्या खेळाडूंमधील वादामुळे पंचांची प्रतिष्ठा कमी होत आहे. या वेळी या पंचांना माहीत नाही की वाद मिटवण्यासाठी संघ आणि कर्णधारांचे किती समर्थन मिळते. या वादाचे कारण स्पष्ट आहे की शिस्त लावण्याची अंतिम जबाबदारी पंचांना देण्यात यावी. त्यामुळे क्रिकेटमधील पारदर्शकता स्पष्ट होईल. हे सर्व आपल्यावर आहे की, आपल्याला हे हवे की नाही!